आदरणीय काका : बेस्ट संपादक उत्तमराव दगडू, ( काका )

 जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि विभागीय मराठी दैनिक, दैनिक गाववालाचे संस्स्थापक संपादक उत्तमराव दगडू, ( काका ) यांचे नुकतेच म्हणजे दि ०५ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाले. ते ९४ वर्षे वयाचे होते. उद्या दि १७ फेब्रुवारी २०२४ रोजी तेरवीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.त्यानिमित्ताने काकांविषयी चार शब्दांत श्रद्धांजलीपर लेख. प्रथमतः काकांना भावपूर्ण श्रद्धांजली.

जीवन कसे
पान जसे
उडून जाईल
पडेल कुठे
मातीमधल्या
कणाकणात
मिसळून जाईल
अलगदसे……
‘ आभाळाखालची माणसं ‘या कविता संग्रहातील प्रा डॉ सुशीलप्रकाश चिमोरे यांच्या या वरील ओळी आहेत. जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि मराठवाडा विभागीय मराठी दैनिक, दैनिक गाववालाचे संस्थापक संपादक उत्तम दगडू, काका,गेले आणि अचानकपणे वरील ओळी कानात रुंजी घालू लागल्या.

काकांनी लौकिक अर्थाने अखेरचा श्वास म्हणजे या भौतिक जगाचा दि ०७ फेब्रुवारी २४ रोजी पहाटे निरोप घेतला. प्रथमतः काकांना भावपूर्ण श्रद्धांजली.!!
काकांची ओळख कशी झाली.? हे आज मला नीट आठवत नाही. पण एक गोष्ट नक्की की आबा पांचाळ यांचा या ओळख होण्यत मोलाचा वाटा होता. शिवाय दुसरे म्हणजे माझी स्थानिक वर्तमानपत्र विकत घेऊन चाळण्याची आणि जमले तर वाचन्याची सवय .अशीच काहीशी माझी आणि काकांची ओळख झाली होती. आज फक्त त्या आठवणी शिल्लक राहिल्या आहेत.
आक्टोबर २०१७ ला आमच्या महाविद्यालयात नँक पिअर टीम येणार होती. तीस Best प्रॅक्टिस म्हणून एखादा चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे , ते दाखवतात.साहजिकच तेंव्हा माझ्या मनात इतरांसारखाच प्रश्न निर्माण झाला.आता नँक तर येणार आहे. पण Best practice म्हणून काय दाखवायचे. जसा तो पडला तसा तो लगेच सुटला. कारण त्या अवघड क्षणी मला प्रथमतः आठवले ते म्हणजे जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि दैनिक गाववालाचे संस्थापक संपादक उत्तम दगडू काका. म्हणून तो प्रश्न सुटला तो काकांमुळे. कारण तत्पूर्वी जवळजवळ वर्षभरापासून दैनिक गाववाला मध्ये माझ्या काही कविता प्रकाशित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या कविता मी नँकला Best practice म्हणून दाखवू शकलो. त्यामुळे उत्तम दगडू काका माझ्यासाठी Best editor आहेत तर दैनिक गाववाला अर्थातच माझ्यासाठी Best paper आहे. यात शंका नाही आहे.आज मला वाटतं आहे, आठवते आहे की काकांनी आम्हाला वर्तमानपत्रात जागा उपलब्ध करून दिली. हे तर एक सर्व परिचित सत्य आहेच. पण त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी गोष्ट म्हणजे काकांनी आम्हा सर्वांना म्हणजे आम्हा सर्व नवोदितांना एका अर्थाने जागं केलं , सजग केलं. मला वाटतं यामुळे आम्हा सर्वांत निश्चितच अचुकता आणि अपडेटपणा आला. यातील अचुकता यासाठी की रविवारी सकाळी सकाळी आपली एक रचना प्रकाशित होणार आहे , प्रकाशित करायची आहे. म्हणून ती रचना आम्ही परत परत वाचतो. एखादी चुक सापडली तर कंटाळा न करता लगेचच ती दुरुस्त करतो. ती रचना अधिक चांगली कशी होईल ? हे अवार्जुन पाहतो. शिवाय अपडेटपणा यासाठी की आज शनिवार आहे. तर उद्या सकाळी विकेंड म्हणजे रविवार आहे. आपली एक कविता दैनिक गाववालामध्ये प्रकाशित होणार आहे. तेंव्हा नवीन एखादे काव्यपुष्प गुंफणे ती टाईप करणे आणि प्रेसला पाठवून देणे. हाच तो अपडेटपणा होय. तो आमच्यात आला. तो काकांनी आमच्यात आणला. हे पण खरे आहे.इथं मी एक प्रांजळ कबुली देऊ इच्छितोय. ती म्हणजे या माझ्या कविता फार फार दर्जेदार होत्या असे काही नाही.पण हे पण खरं आहे की त्या कविता माझ्या स्वतःच्या होत्या. शिवाय त्या एका विभागीय दैनिकात प्रकाशित होत होत्या. काकांनी त्या प्रकाशित केल्या.त्यामुळे एका अर्थाने त्या दर्जेदारच होत्या.असे जणू शिक्कामोर्तब केले आणि मी स्वताला अधिक चांगला कवी समजू लागलो..
या गोष्टीचा मला दुहेरी आनंद झाला होता. एक म्हणजे स्थानिक पातळीवरचा विचार केला तर इतरांपेक्षा वेगळे काहीतरी मी करत होतो ,केलो होतो.आणि दुसरा म्हणजे या पेक्षा मोठा आनंद होता. तो म्हणजे मी नँकला सामोरं जाण्यासाठी चांगल्या मनस्थितीत आलो होतो. त्यावेळी आमचे ग्रंथपाल दराडे जी एस यांनी पण ती फाईल मला मागवून घेऊन ग्रंथालयात जपून ठेवली आहे, आजपर्यंत.Something is better than nothing. या म्हणीप्रमाणे मी काहीतरी चांगले करणाऱ्यांच्या यादीत आलो होतो.
शेवटी गीतकार गुरु ठाकूर यांची माफी मागून आणि त्यांच्या शब्दात थोडा बदल करून म्हणेल की,
स्थानिक प्रश्नाचे सजग भान तुम्ही
बोली भाषेतील अक्षरांचे रान तुम्ही.

प्रा भगवान कि आमलापुरे
फुलवळ ता कंधार
द्वारे कै शं गु ग्रामीण महाविद्यालय,
धर्मापुरी ता परळी वै.
मो. नं‌.+91 96890 31328

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *