कंधार :- श्री. शिवाजी महाविद्यालय कंधार येथे प्राध्यापक असलेले डाँ. अब्रार बेग अशफाक बेग यांनी वनस्पतीशास्ञा मध्ये डाँ. डि. के. सिंग, डाँ. आर. एम. कदम याच्या मार्गदर्शनाखाली श्री. जे. जे. टी. विद्यापीठ राजस्थान येथे प्रवेश घेऊन 3 वर्ष अथक परिश्रम घेऊन पि. एच. डी. प्राप्त केली व त्याना पि. एच. डी. प्रदान करण्यात आली आहे. यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल श्री. आनंद बोस, झारखंडचे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांची प्रमुख उपस्थिती होती.
या यशाबद्दल श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाई प्रा. डॉ. पुरुषोत्तमरावजी धोंडगे साहेब,सचिव माजी आ. गुरुनाथजी कुरुडे साहेब, सहसचिव ॲड. मुक्तेश्वररावजी धोंडगे साहेब , उपाध्यक्ष माधव पेठकर, संशोधन मार्गदर्शक डॉ. डी. के. सिंग व डॉ. आर. एम. कदम, प्राचार्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, प्राचार्य अशोकरावजी गवते, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. किशोर शेंडगे, प्रा.डॉ.डि.च.इंगळे ,प्रा.मनोज पेटकर आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व सर्व मित्र मंडळी नी अभिनंदन केले.