अखंड हिंदुस्थान च्या दैवताला फुलवळ येथे ठिकठिकाणी अभिवादन..

 

फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे )

अठरा पगड जाती-धर्माला एकत्रित घेऊन मावळे ही समान पदवी देत पर नारी ला मातेसमान दर्जा देण्याची शिकवण देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फुलवळ येथे ठिकठिकाणी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

येथील जि. प.कें. प्रा.शाळा , श्री बसवेश्वर विद्यालय शाळा तसेच ग्राम पंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपरोक्त दोन्ही शाळेतील शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते तर ग्राम पंचायत कार्यालय येथे सरपंच विमलबाई मंगनाळे , ग्राम पंचायत सदस्य प्रवीण मंगनाळे , श्रीकांत मंगनाळे , लिपिक मनोहर जाधव , शाळेत व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश पांचाळ , जेष्ठ नागरिक विठ्ठलराव तुप्पेकर , पत्रकार मधुकर डांगे , धोंडीबा बोरगावे , माधव गलपवाड , संदीप बसवंते , विठ्ठल मंगनाळे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *