राजेश्‍वर कांबळे राज्यस्तरीय दर्पण पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित.

 

प्रतिनिधी, कंधार
—————-
येथील प्रख्यात पत्रकार राजेश्‍वर कांबळे यांना राज्यस्तरीय दर्पण पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समाज कल्याण नांदेडचे सहाय्यक आयुक्त शिवानंद निमगिरे यांच्या हस्ते राजेश्‍वर कांबळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

उज्वल प्रतिष्ठान, कंधारचा राज्यस्तरीय उज्वल पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता श्रामणेर प्रशिक्षण केंद्र, खुरगाव, नांदुसा ता.जि.नांदेड येथे दिमाखात पार पडला. यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो, पीपल्स काॅलेजचे उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा.डाॅ.हेमत सोनकांबळे, डॉ.चेतनकुमार खंडेलोटे, डॉ.सोनाली खंडेलोटे, प्रा.एस.एच.हिंगोले, प्रा.विनायक लोणे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, जिल्हाध्यक्ष रणजीत गोणारकर, कोषाध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, प्रशांत गवळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश ढवळे नागलगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात प्रख्यात पत्रकार राजेश्‍वर कांबळे यांना राज्यस्तरीय दर्पण पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समाज कल्याण नांदेडचे सहाय्यक आयुक्त शिवानंद निमगिरे यांच्या हस्ते राजेश्‍वर कांबळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पदक, ग्रंथ, मानाचा फेटा, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा आहे.

राजेश्‍वर कांबळे हे अत्यंत प्रतिभावान पत्रकार आहेत. गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध क्षेत्रावर त्यांनी विपुल लेखन केलं आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक बातम्या गाजल्या आहेत. सकारात्मक, निर्भीड, निष्पक्ष, भेदक, सर्वसमावेशक, विश्लेषणात्मक लिखाण करणारे पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी निस्वार्थी हेतूने पत्रकारिता केली आहे.

त्यांची पत्रकारिता सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. केवळ तालुक्यातच नाही तर जिल्ह्याबाहेरही त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्या ‘कोरोना रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिका ठरतेय जीवनदायी’ या बातमीला २०२२ साली मराठवाडास्तरीय शोधवार्ता पत्रकारिता पुरस्कारही मिळालेला आहे. कमी वयात ते जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी महत्वाचे योगदान दिलेले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *