काल सकाळचीच गोष्ट… सचिन दाढी करत असताना त्याने एकदम बारीक नळ सुरु ठेवला होता.. पाणी , लाईट आणि अन्न कणभरही वाया गेलेलं आवडत नाही.. कुठेही थेंबथेंब पाणी गळतय हे लक्षात जरी आलं तरीही मी स्वतः जाऊन नळ बंद करते.. उन्हाळ्यात भाज्या धुतलेलं पाणीही झाडाना घालते.. सचिन ला नळ बंद कर सांगण्यापेक्षा जरा प्रेमातच म्हटलं , या जन्मी मी तुला प्रपोज केलय .. नळ बंद कर नाहीतर पुढचा जन्म वाळवंटात मिळेल आणि तिथे प्रपोज करायला मी येणार नाही..
पाणी , लाईट जपून वापरणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे पण एखादा ऐकत नसेल तर त्याला प्रेमाच्या भाषेत सांगणं हे स्कील आहे.. ते प्रत्येक व्यक्तीगणिक वेगळं असायला हवं आणि जेव्हा जेव्हा आपल्या स्कीलचा उपयोग करता येइल तिथे त्या पध्दतीने तो करुन ही सामाजिक संपत्ती आपल्याला जपता यायलाच हवी..
नाहीतर ज्या ठिकाणी १५ दिवसांनी पाणी येतं तीथले लोक म्हणतात , आम्ही काय पाप केलं म्हणुन आमच्या नशीबी हे आलं असं म्हणायची वेळ येउ नये म्हणुन प्रत्येक गोष्ट जपुन करायची..
इथुन पुढे ३/४ महीने आपल्या प्रत्येकाच्या तोंडचं पाणी पळणार आहे.. आताच उन्हाळा असह्य होत चालला आहे त्यामुळे मी स्वतः आतापासुन पाणी आणि लाईट जपुन वापरेन अशी शपथ घेउ .. प्रत्येकाने केलं तर दुसऱ्याला सांगावच लागणार नाही..
जसं आपण पाणी , लाईट जपून वापरणार आहोत तसेच शब्दही जपून वापरायचे आहेत.. काल माझ्याकडून लिहुन घेतल्या गेलेल्या प्राउड टु बी अ ट्रांसवुमन या आठव्या पुस्तकाचं प्रकाशन झालय , जेव्हा पारलींगी मंडळी रस्त्यावर दिसतात त्यावेळी त्यांना मदत करायची नसेल तर करु नका पण त्यांना वाईट शब्द वापरुन दुखवण्याचा अधिकार आपल्याला नाही… समाजातील प्रत्येक घटकाला आपण आदर दिला तर आपल्याला आदर मिळेल.. आनंद दिला तर आनंद मिळेल त्यामुळे आपल्याला जे हवय तेच दुसऱ्याला देउयात. महिला दिन जवळ येत आहे त्यामुळे एक दिवस उदोउदो करण्यापेक्षा प्रत्येक क्षणी आपण त्यांचा आदर करुयात.
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi