प्रिय सोनल मॅडम
प्रकाशनाला आलो आणि तुम्हाला भेटून धन्य झालो. सेक्स वर बिंधास्तपणे बोलणाऱ्या स्त्रीला भेटायची खुप इच्छा होती.
निळ्या शालूत तुम्ही अप्सरेसारख्या दिसत होत्या. चालण्याबोलण्यात असलेला आत्मविश्वास आणि ज्ञान तुमचे बोलणे हसत माझ्यापाशी येउन माझी चौकशी करणे किती तो साधेपणा आणि कादंबरी मॅडमवर बहीणीसारखी करत असलेली माया तुमच्या शब्दातुन ओसंडुन वहत होती. मॅडम मी तुमचा फॅन आणि वाचक आहे. खास तुम्हाला पहायला पिंपरीहुन आलो होतो. आता पुस्तक वाचुन संपवले आणि तुम्हाला मेसेज करावा वाटला. कादंबरी मॅडम नी किती भोगलय हो. तृतीयपंथी म्हणजे भीक मागतात असच वाटायचं पण त्यादिवशी तुमच्या तोंडुन बोलताना ऐकले कोनीतरी मॅडम आयटीमधे पन जॉब करतात. तुमचे शब्द काळजाला भेगा देउन गेले आणि तुमच्यासारख्या देवीला पाहुन घन्य झालो मॅडम. पुढच्या प्रकाशनाला बोलवा मॅडम मी नक्की येइन.
दिगंबर माने