Post Views: 92
नांदेड- श्रामणेर प्रशिक्षण केंद्र हे बुद्धाची एक सशक्त धम्मचळवळ म्हणून उभे राहिले आहे. येथे धम्मप्रचार आणि प्रसाराचे कार्य विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून चालते. अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धाने सांगितलेला विचार समाजापर्यंत नेण्याचे कार्य श्रामणेर प्रशिक्षण केंद्र करीत आहे असे प्रतिपादन येथील सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद निमगिरे यांनी केले. ते तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आयोजित शिवजयंती आणि पौर्णिमोत्सव कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघ, डॉ. सोनाली खंडेलोटे, डॉ. चेतकुमार खंडेलोटे, डॉ. हेमंत सोनकांबळे, अशोक धुतराज, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, प्रा. विलास वाठोरे, एस. एन. गोडबोले, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, कार्यालयीन सचिव मारोती कदम, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, प्रशांत गवळे, उज्ज्वल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश ढवळे नागलगांवकर, आप्पाराव नरवाडे, अनिता नरवाडे, सुरेखा नरवाडे, सागर नरवाडे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना माल्यार्पण केल्यानंतर अभिवादन करण्यात आले. भिक्खू संघास पुष्पवंदन करून पंचांग प्रणाम करण्यात आला. याचनेवरुन भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. मान्यवरांच्या सत्कारानंतर उज्वल प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय साहित्यरत्न व विविध क्षेत्रातील पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांनी शिवजयंतीनिमित्त वृत्तपत्र लेखांचे विमोचन करण्यात आले. कवी गीतकार संगीतकार संजय कदम यांच्या भीमगीतांचे लोकार्पणही संपन्न झाले. तसेच डॉ. विद्याश्री येमचे यांच्या नृत्य प्रहसनास प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. दरम्यान, मास्टर कुलदीपक राक्षसमारे आणि सिद्धू शेळके यांच्या लेझीम पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधले.
तिसऱ्या सत्रात डॉ. आनंद इंजेगावकर, अॅड. दीपा सूर्यवंशी, लेखिका कमल कदम यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ. अपेक्षा नरवाडे, प्रज्ञाधर ढवळे यांनीही आपले विचार मांडले. भीमशाहीर सुभाष लोकडे आणि संचाचा बुद्ध भीम गितांचा प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला. गंगा काॅलनी पंचशील नगर आणि श्रमसाफल्य नगर येथील बौद्ध उपासक उपासिकांकडून भिख्खू संघास व उपस्थित जनसमुदायास भोजनदान दिले. यावेळी भिख्खू संघाची धम्मदेसना संपन्न झाली. दान पारमिता कार्यक्रमात अनेकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अपेक्षा इंगोले व रणजीत गोणारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. एस. एच. हिंगोले यांनी केले.