फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने तालुका जिल्हा आणी राज्य अशा विविध स्तरावर मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या अनुषंगाने कंधार तालुक्यातील ४७८ शाळांचा सहभाग होता. त्यातील इतर शाळांना मागे टाकत खाजगी शाळांच्या स्पर्धेत फुलवळ च्या श्री बसवेश्वर विद्यालय शाळेने प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
यांमध्ये विविध उपक्रम राबवले त्यात शाळेच्या परिसराची स्वच्छता, वर्गाची सजावट, पोषण आहारा अंतर्गत केलेली परसबाग, शालेय मंत्रीमंडळ, राष्ट्रीय एकात्मता, बचत बँक, स्वच्छता मॉनीटर असे कार्यक्रम घेन्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा कुला गुणांचा समावेश असतो ही कौशल्य बाब या सुप्त निदर्शनास आली.
वरिल सर्व उपक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे पार पाडली. तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळा असुनसुद्धा हा बहुमान प्रस्तूत् शाळेने पटाकाविल्या बदल गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी , पालकांनी शाळेचे भरभरून कौतूक केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वैजनाथराव सादलापुरे , सेवा निवृत्त तालुका कृषी अधिकारी विश्वंभरराव मंगनाळे शिक्षण समितीचे अध्यक्ष बसवेश्वर मंगनाळे , पालक व गावातील नागरिक यांनी शाळेचे मुख्याध्यापक मंगनाळे बि.एन व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तालुकास्तरीय निकाल पुढील प्रमाणे..
जिल्हा परिषद शाळा
१) जि.प.कें.प्रा.शा.शिराढोण (प्रथम)
२) जि.प.प्रा.शा.घोडज (द्वितीय)
३) जि.प.प्रा.शा.लाठ(खु.) (तृतीय)
खाजगी शाळा
१) श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ (प्रथम)
२) श्री शिवाजी मा.व उच्च मा.विद्यालय बारुळ (द्वितीय)
३) ग्लो ॲण्ड ग्लो इंग्लिश स्कुल कंधार (तृतीय)
श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ (प्रथम)