कंधार ( दिगांबर वाघमारे )
तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी महाराष्ट्रात प्रथमच कॉपीमुक्ती साठी नामी शक्कल लावली आहे. बारावीच्या परीक्षा सुरळीत व भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी परीक्षा केंद्र व परीसराचे ड्रोन द्वारे चित्रिकरण केले.कंधार तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत आणि शांततेत पार पडल्या चे आवाहन तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले.
कंधार तालुक्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक विद्यालय पानभोसी, आंबुलगा, गोणार, पेठवडज, गांधीनगर या 12 च्या परीक्षा केंद्रावर ड्रोन द्वारे चित्रिकरण केले व काॅपी मुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी प्रयत्न केला. कंधार तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर मा. तहसीलदार यांनी बैठे पथक तैनात ठेवले आहे. भरारी पथक दोन तयार करण्यात आले आहेत. त्यात केंद्र प्रमुख, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांचा समावेश आहे. ड्रोन च्या प्रयोगामुळे कंधार तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर सुरळीत आणि शांततेत होत असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मा शिक्षण मंडळा तर्फे २१ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली, या परीक्षेसाठी ५ हजार ८३३ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी ५ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तब्बल २२७ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली.
गटसाधन केंद्र, पंचायत समिती, कंधार अंतर्गत श्री शिवाजी कॉलेज, नवरंगपुरा २५६, श्री शिवाजी हायस्कूल, कंधार २०४, – लालबहादूर शास्त्री ज्युनिअर कॉलेज, संगुचीवाडी २६५, श्री बालाजी उच्च माध्यमिक विद्यालय, बोरी खु २०३, श्री शिवाजी विद्यालय, कुरूळा ३०९, पोस्ट बेसिक उच्च माध्यमिक शाळा, गांधीनगर २९७, श्री शिवाजी विद्यालय, बारूळ २८६, नेताजी सुभाषचंद्र बोस माध्य व उच्च माध्य शाळा, पानभोसी ७९८, गोविंदराव पाटील विद्यालय, चिखली ३८८, भीमाशंकर विद्यालय, शिराढोण ५०७, महात्मा फुले विद्यालय, शेकापूर ४२२, संत नामदेव महाराज ज्युनिअर कॉलेज, पेठवडज ४५५, मनोविकास माध्यमिक विद्यालय, कंधार २३४, शांतीदूत गोविंदराव पाटील माध्यमिक विद्यालय, गोणार ४०८, महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज, बाचोटी ३२७, माणिकप्रभु विद्यालय, आंबुलगा २४७ आदी एकूण १६ परीक्षा केंद्रावर ५ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली.
यावेळी तब्बल २२७ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. तसेच परीक्षेत नक्कल करणाऱ्या ८ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले असून त्यांना रस्टिकेट केल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.