पत्रकार भवनासाठी कंधार तहसील कार्यालया समोर जागा उपलब्ध करून देण्याची पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मयुर कांबळे यांची तहसिलदारांना गोरे यांना मागणी

 

कंधार : प्रतिनिधी

कंधार शहरातील तहसील कार्यालयासमोर उपलब्ध असलेली नगर परिषदेची जागा पत्रकार भवनसाठी उपलब्ध करून द्यावी असे निवेदन कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांना पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मयुर कांबळे यांनी आज शुक्रवार दि.23 फेब्रवारी रोजी दुपारी तिन च्या सुमारास दिले आहे.

 

अनेक पत्रकारांना वृत्त संकलनासाठी फिरावे लागते पत्रकार भवन नसल्या कारणाने मोठी तारांबळ उडत आहे.लोकशाहीच्या चौथ्या आधार स्थंभालाच आधार नसल्याचे निवेदनात त्यांनी नमूद केले.

 

त्यांना,उन,वारा,पाऊस सहन करून वृत्त संकल करावे लागत आहे. त्यांचा हा होणारा त्रास आपण लक्षात घेऊन पत्रकारांना त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे असे निवेदन दिले

 

दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, पत्रकारांना त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे.जेणेकरून आपण जागा उपलब्ध करून दिल्यास शहरातील पत्रकारांच्या अडचणींचे निवारण होईल व शहराचे उज्वल भवितव्य घडेल कंधार शहरात तहसील कार्यालयासमोर नगर परिषदेची असलेली जागा पत्रकार बांधवांसाठी पत्रकार भवणसाठी उपलब्ध करून देऊन सहकार्य अशी विनंती पत्रकार मयुर कांबळे यांनी तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याकडे केली आहे या निवेदनाच्या प्रति उपविभागीय अधिकारी कंधार व मुख्याधिकारी नगरपरिषद कार्यालय यांना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *