प्रतिनिधी, कंधार
—————
तालुक्यातील कुरुळा येथील रहिवासी श्रीमती विष्णूबाई सूर्यकांत ढवळे यांना या वर्षीचा रमाई गणगोत पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या सचिव दलजीत कौर, माजी उपजिल्हाधिकारी जे.डी.गोणारकर, ज्येष्ठ विधिज्ञ विजय गोणारकर, बार्टीच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे, लोहा समतादूत ज्योती जाधव, सोनखेड पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक वैशाली कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, राज गोडबोले, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, थोरात बंधू यांच्या हस्ते शनिवारी, २४ फेब्रुवारी रोजी लोहा तालुक्यातील जवळा देशमुख येथे होणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
लोहा तालुक्यातील जवळा देशमुख येथील त्यागमुर्ती माता रमाई विचारमंचाच्या वतीने दरवर्षी रमाई गणगोत पुरस्कार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी माता रमाई आंबेडकर यांचा आदर्श घेऊन आपल्या कुटुंबाची जडणघडण करणाऱ्या महिलांना देण्यात येतात. साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांच्या मातोश्री विष्णूबाई ढवळे यांच्यासह आदर्श माता रुक्मिणीबाई गोणारकर, सरस्वती कांबळे, जयश्री गोडबोले, पद्मीनबाई कोकरे, सुंदरबाई कांबळे, सरोजाबाई खिल्लारे, वत्सलाबाई सोनसळे यांचा समावेश आहे.