संघटनेच्या माध्यमातून सेवानिवृत्तांचे निवृत्तांचे प्रलंबित प्रश्न सोडवणार – बालाजी डफडे

 

भोकर / ता . प्र . / महाराष्ट्रराज्य सेवानिवृत्त शिक्षक , शिक्षकेत्तर , कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हा शाखांची निर्मिती करण्यात आली असून एकसंघ संघटनेच्या माध्यमातून सेवा निवृत्तांचे प्रलंबीत प्रश्न सोडवणार असल्याचा विश्वास मोघाळी येथील आढावा बैठकीत राज्य संघटक बालाजी डफडे यांनी व्यक्त केला .

भोकर तालुका शाखेची आढवा बैठक मोघाळी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदराव आनंतवाड यांच्या फार्महाऊस येथे घेण्यात आली . बैठकीच्या अध्यक्षपदी निवृत्त मुख्याधापक दत्तराम कदम होते . प्रमुख मार्गदर्शक राज्य संघटक बालाजी डफडे होते . प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्षा विजया घिसेवाड , जिल्हा सरचिरणीस रमेश गोवंदे निवृत्त आरोग्य अधिकारी डॉ . नारायणराव कस्तुरे , जिल्हा उपाध्यक्ष शेख एम .पी . जि . सं .शेख आर .एम . कंधार तालुकाध्यक्ष गणातराव गुट्टे , माजी जि.प .सदस्य आनंदराव एलमगोंडे , व्यंकटराव पाटील लाडेकर, धोंडीबा गुंटुरे यांची उपस्थिती होती . प्रथम क्रांती ज्योती सावित्री फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व राज्य उपाध्यक्ष सुधिर गोडघासे यांच्या मातोश्री कमलबाई गोडघासे यांचे नुकतेच दुःखद निधन झाल्याने शोक व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

 

निवृत्त मुख्याध्यापक व महाराष्ट्र राज्य कुलेकडगी समाज संघटनेचे नेतेआनंदराव नारायणराव आनंतवाड यांचा 78वा जन्म दिवस असल्याने केक कापून शाल पुष्पहार देवून सपत्नीक सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या . उमरी तालुका अध्यक्ष म्हणून गंगाधरराव देशमुख , सरचिटणीस म्हणून बळीराम करपे यांची निवड करण्यात आली .प्रमुख मार्गदर्शक बालाजी डफडे म्हणाले सातव्या वेतनाचा दुसरा ,तिसरा व चौथा हप्ता , मानवीय वेतनवाढ , रजा रोखीकरण , निवृत्तांचे उपदान , जीपीएफ , जीआयएस , संगणक अर्हता पूर्ण न केलेल्या ची वसूली या सेवा निवृत्तांची अनेक प्रकरणे प्रलंबीत होती पण संघटनेच्या पाठपुराव्याने बरीच प्रकरण निकाली निघाली असून उर्वरीत प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवून न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले . जिल्हा अध्यक्षा विजया घिसेवाड यांनी संघटना बळकट करण्यासाठी अजिव सदस्य होण्याचे आवाहन केले .

कंधार तालुकाध्यक्ष गणपतराव गुट्टे यांनी जिल्हा शाखा निवृत्तांच्या प्रश्नासाठी प्रयत्नपूर्वक पाठपुरावा करत असल्याने थकीत हप्त्याचा प्रश्न सुटला असल्याचे सांगितले . सुत्रसंचालन सुरेश मुपडे यांनी तरआभार किशनराव एलमगोंडे यांनी मानले शेवटी आनंदराव आनंतवाड यांनी दिलेल्या सुरुची भोजनाने बैठकीची सांगता करण्यात आली . यावेळी तालुक्यातील असंख्य सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *