मुखेड येथे प्रा.कुसुमताई निवृतीराव चांडोळकर लिखीत कुसुम कथा पुस्तकाचे प्रकाशन व मराठी साहित्य संस्कार संम्मेलन संपन्न

 

मुखेड – दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी साहित्य संस्कार मंडळातर्फे मुखेड येथे होणाऱ्या मराठी साहित्य संस्कार संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठवाड्यातील प्रसिद्ध लेखिका विद्या बयास-ठाकूर यांची निवड करण्यात आली होती. तर या संमेलनाचे उद्घाटक म्हणून नामवंत ग्रामीण कवी प्रा. निवृत्ती चांडोळकर यांची निवड करण्यात आली.

 

मराठी साहित्याचे संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहचावेत, त्यांच्यात रुजावेत, शालेयस्तरावरून नव्या साहित्यिकांची पिढी घडावी या उद्देशाने इसाप प्रकाशनाद्वारे संचालित मराठी साहित्य संस्कार मंडळाच्या वतीने महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरही मराठी साहित्य संस्कार संमेलने घेण्यात आले.

त्याअंतर्गत मुखेड येथे हे संमेलन घेण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखिका विद्या बयास ठाकूर यांची निवड करण्यात आली होती.
विद्या बयास ठाकूर यांनी आपल्या कवितांमधून समंजस संवेदनशील मनाचे भावविश्व.. आभाळ अंतरीचे साकारले आहे. तर ‘तळझिरा’ या भावरम्य ललित लेखसंग्रहातून ग्रामीण जीवन प्रत्यक्षात आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत अशातऱ्हेने उत्कटतेने साकारले आहे. तसेच अनेक साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून व शाळा आणि महाविद्यालयांमधून त्यांनी अनेकदा आपल्या कविता सादर केल्या आहेत. अनेक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत.

तसेच या संमेलनाचे उद्घाटक म्हणून नामवंत ग्रामीण कवी प्रा. निवृत्ती चांडोळकर यांची निवड झाली आहे. त्यांचे रानवेल, रानवेध, रानकाटे, …. हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. मराठी ग्रामीण साहित्य चळवळीचे जनक सुप्रसिद्ध लेखक ‘झोंबी’कार आनंद यादव यांनी निवृत्ती चांडोळकर यांच्या काव्यलेखनाचे कौतुक केले आहे.

  1. या संमेलनात ग्रंथदिंडी काढण्यात आली त्याचे उद्‌घाटन डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी केले व नंतर ग्रंथ गुढी उभारण्यात आली मग प्रा. कुसुमताई निव्रतीराव चांडोळकर लिखीत कुसूम कथा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले साहित्य संमेलनास इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे डॉ.दिलीप पुंडे श्री दा.मा.बोंडे श्री व्यंकटेश चौधरी सौ.अनुजा मनोज भरडे , स्वप्नजा चांडोळकर, संतोष तळेगावे, पंडित पाटील बेरळीकर आणि विजयकुमार चित्तरवाड सह मान्यवर उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एकनाथ डूमने सर यांनी केले तर आभार मनोज भरडे सर यांनी मानले

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *