कंधार ; प्रतिनिधी
व्यक्तीमत्व विकासासाठी विविध स्पर्धा, मैदानी खेळ व सर्व प्रकारच्या कलागुणांना वाव देणे आवश्यक आहे, पुर्वी खेळ व इतर बाबीकडे दुर्लक्ष करुन फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायला सांगितले जायचे मात्र तसे न करता सर्व प्रकारच्या स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांनी तयार रहावे, मैदानी खेळ खेळा, मात्र मोबाईल पासुन दुर रहा असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेत आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी केले यावेळी अड गंगाप्रसाद यन्नावार, शिक्षक नेते राजहंस शहापुरे, भास्कर कळकेकर, बसवेश्वर मंगनाळे, उमेश भुरेवार,मुख्याध्यापक सुभाष मुंडे गुरुनाथ कल्याणकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापीका सिंधुताई यन्नावार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कंधार शहरातील रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन व छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते, यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर अप्रतीम नृत्य सादर केले, छत्रपती शिवाजी महाराज यांची गीते,भक्तीगीते, लावणी, देशभक्तीपर गीते, डीजे साॅंग, नाटीका यातुन विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली, सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अड गंगाप्रसाद यन्नावार यांनी केले,
सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनी अक्षरा कमलेश टेंभुर्णेवार हिने केले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सुभाष मुंडे, सहशिक्षक सुर्यवंशी आर एच,श्रीमती शेख वाय आय, श्रीमती यन्नावार एम जी, हनुमंते व्हि डी, होंडाळे आर आर, तिडके ई पी, यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते.