अविनाश कांबळे यांनी स्वीकारला कंधार उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार !

निवडणुकीच्या अनुषंगाने तलाठी – मंडळ अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य आवश्यक..-अविनाश कांबळे..
—————————————-
कंधार /मो सिकंदर
कंधार – लोहा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांची नुकतीच प्रशासकीय बदली झाली. असल्यामुळे कंधार उपविभागीय अधिकारी पद रिक्त झाले होते. सदरच्या ठिकाणी जालना येथे कार्यरत असलेले अविनाश कांबळे यांची कंधार येथे बदली झाली असून,त्यांनी कंधार उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारताच तहसीलदार रामेश्वर गोरे व नव्याने लोहा तहसीलदार म्हणून रुजू झालेले विठ्ठल परळीकर,ना.तह. दिगंबर लोंढे, अनिल परळीकर, उर्मिला कुलकर्णी, गणेश मोहिजे यांनी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे .

सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदलीचे सत्र सुरू असून,त्याच अनुषंगाने कंधारचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक व तहसीलदार राम बोरगावकर यांची बदली झाली आहे.तहसिलदार रामेश्वर गोरे हे या आगोदरच रुजू झाले आहेत तर उपविभागीय अधिकारी पदाचा तात्पुरत्या स्वरूपात पदभार लोहा तहसीलदार यांच्या कडे देण्यात आला होता.जालना येथे कार्यरत असलेले अविनाश कांबळे हे दि.२० फेब्रुवारी २०२४ रोज मंगळवारी उपविभागीय अधिकारी म्हणुन रुजु होताच सर्व तलाठी मंडळ अधिकारी व कर्मचारी, कोतवाल संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांचा स्वागत करण्यात आले आहे.

या वेळी मार्गदर्शन करताना अविनाश कांबळे म्हणाले की, सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे काम सुरू आहे मी आणि तहसीलदार जरी या तालुक्या साठी नविन असलो तरीही निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याशिवाय निवडणुकिचे काम करने फारसे सोपे नाही, त्यासाठी तुम्ही सर्वांनी आपापल्या जबाबदारीने काम करावे असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी केले,

 

या वेळी कंधारचे तहसीलदार रामेश्वर गोरे, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर ना तह अनिल परळीकर ,दिगंबर लोंढे, उर्मिला कुलकर्णी, गणेश मोहिजे,अव्वल कारकून अविनाश पानपट्टे ,माधव पवार, गंगाधर टेंभुर्णीवार, सुनिता वाळुजकर,ज्योती मुंडे, माधुरी ठाकूर,विठ्ठल गादेवार, देवबा वाघमोडे, तिरुपती मुगरे,के. के.ताटिकोंडलवार एस.जी.मुडिक, गजानन मठपती,एस. एस. वंजे,राम पांचाळ,श्रीमती गोरे मावशी, मन्मथ थोटे,श्रीमती पेठकर मावशी, छत्रपती गायकवाड, ज्ञानेश्वर राखे, व्यंकटेश चिवडे, पुरवठा विभागातील संगणक चालक नितीन सुर्य, भुरे,पांगरेकर वहान चालक मिर्झा समीर बेग, मिर्झा जबिल बेग आदी कर्मचारी व अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *