कंधार / प्रतिनिधी
कंधार शहराच्या दर्शनीय भागात जागा उपलब्ध करून देऊन त्या जागेवर महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी कंधार च्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारले असून मागणी मान्य होईपर्यत उपोषण चालूच राहणार असल्याची माहीती उपोषणकर्ते सचिन पेठकर यांनी आज शुक्रवार दि.23 फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या दरम्यान उपोषणस्थळी दिली.दरम्यान विविध सामाजीक व राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी उपोषणास भेटी देवून मागणीचे समर्थन करत पाठींबा दर्शविला.
महात्मा बसवेश्वर महाराज यांनी बाराव्या शतकात समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचा पुरस्कार करत शरण चळवळ उभी करून; लोकशाही मूल्यावर आधारित समाज रचनेची पायाभरणी केली. महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा कंधार शहरांमध्ये उभारावा, त्यामुळे महापुरुषांचे चित्र समोर असले की त्यांचे विचार पुढच्या पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारे असेल असे निवेदनात म्हटले आहे.
कंधार शहरात क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात यावा या मागणीसाठी लिंगायत समाजातील सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन भाऊ पेटकर हे आमरण उपोषणास बसले असून आज त्यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवा भाऊ नरंगले सह या मागणीस पाठिंबा दिला यावेळी बसव ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष अविनाश भाऊ भोसीकर , युवानेते तथा माजी नगरसेवक शहाजी मळगे, माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक बालाजी चुकलवाड,
नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटिचे सरचिटणीस संजय भोसीकर,माजी उपनगराध्यक्ष सुधाकरराव कांबळे,माजी पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे, माजी नगरसेवक सुधाकर अण्णा कांबळे, मयुर कांबळे, बापुराव वाघमारे,पटणे गुरुजी,कंधार शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजय मोरे,तालुका कॉग्रेस सरचिटणीस सुरेश कल्लाळीकर,शिवम पाटील कुरुळेकर ,गुरुनाथ कारामुंगे,अॅड रवी केंद्रे,नितीन राजुरकर,नाना चिवळे,गजानन टाले,विठ्ठल गिरी महाराज आदींसह समाज बांधवाची यावेळी उपस्थिती होती.