कंधार: प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी शाळा “सुंदर शाळा” स्पर्धेत कंधार तालुक्यातील जि.प.प्रा.शा. घोडज या शाळेने द्वितीय येण्याचा बहुमान मिळवला,त्यामुळे घोडज येतील शिक्षक ,पालक, विद्यार्थी तसेच शिक्षण प्रेमी मधून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने ही स्पर्धा केंद्र ,तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर आयोजित केली होती, या अनुषंगाने कंधार तालुक्यातील सहभागी शाळांना मागे टाकत द्वितीय येण्याचा बहुमान मिळवला या उपक्रमांतर्गत विद्यार्थी सहभाग असलेले विविध उपक्रम राबविण्यात आले,यात वृक्षारोपण ,वर्ग सजावट, सांस्कृतिक वारसा, बचत बँक, परसबाग,स्वच्छता मॉनिटर, नवभारत साक्षरता ,आर्थिक साक्षरता असे विविध उपक्रम घेण्यात आले, यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कला ,कौशल्य या सूप्त गुणांचा विकास होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे.
हे सर्व उपक्रम विद्यार्थी व शिक्षक तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका इंदू डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे पार पाडले. या शाळेने तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्द कंधार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वसंत मेटकर, शिक्षण विस्तार अधिकारी संजय येरमे, केंद्रप्रमुख कांबळे यांनी शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले आहे.
घोडजच्या सरपंच सौ. महानंदा आत्माराम लाडेकर, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी सर्व शिक्षक बांधवांचा सत्कार करून, कौतुक केले तर पालक वर्गातूनही कौतुकाची थाप देण्यात आली.
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व्यंकटी तेलंगे, उपाध्यक्ष ज्योती घोडजकरसह सदस्य यांनीही कौतुक केले.सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शिवाजी वाघमारे ,गुणवंत कपाळे, विमल सगर, गजानन पांचाळ, मनीषा वाघमारे ,मधुकर मुनेश्वर यांनी परिश्रम घेतले.