नांदेड : प्रतिनिधी
कंधार येथील अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा पुर्वीच्याच ठिकाणी राहू द्यावे, यासाठी जिल्हाधिकारी मा.अभिजित राऊत यांची भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली.
मा.जिल्हाधिकारी राऊत यांनी तातडीने कंधार येथे भेट देऊन निवेदनात नमूद मागणीनुसार जलदगतीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात प्रा.रामचंद्र भराडे सर बालाजी कांबळे संभाजी वाघमारे, महेंद्र कांबळे, रोशन जाधव किरण गोंटे माधव कपाळे सुधीर कांबळे रेणुकादास भिसे विलास भिसे सोनू वाघमारे माधव गायकवाड विकास गायकवाड साई गायकवाड लक्ष्मण कांचन गुंडेकर वाघमारे संतोष नवघरे ऋषिकेश वाघमारे अभिजित कांबळे प्रदीप इंगळे श्याम गडंबे बाबळे कंधार येथील बहुसंख्य तरुण पदाधिकारी उपस्थित होते.