प्रतिनिधी: कंधार
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज यांची 285 जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होणार असून. दि .२६ फेब्रुवारी रोजी कंधार शहरात निघणाऱ्या मिरवणुकीत बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कंधार पंचायत समितीचे माजी सदस्य उत्तम चव्हाण यांनी केले आहे.
बंजारा समाजाचे क्रांतिकारी धर्मगुरू सेवालाल महाराज यांचा जयंती महोत्सव सोहळा कंधार शहरात दिनांक 26 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला असुन शहरातील माईचे मंदिर येथून सकाळी अकरा वाजता भव्य दिव्य संत सेवालाल महाराज यांची मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकी नंतर शिवरामजी पवार मंगल कार्यालयात कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय पवार राहणार असून. कंधार मुखेड विधानसभेचे आमदार डॉ.तुषार राठोड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल .
पोहरा गडाचे गडाचे महंत बाबू सिंग महाराज यांच्या हस्ते भोग विधी व आशीर्वचन होईल.कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष देविदास भाऊ राठोड , मा. जि .प .सदस्य संतोष राठोड संभाजीनगरचे तहसीलदार विजय चव्हाण, सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंग राठोड, माजी पंचायत समिती सभापती रामचंद्र राठोड, बंजारा क्रांती दलाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदरर्शिंग जाधव, माजी नगरसेवक श्रीनिवास जाधव, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान राठोड, लोहा पंचायत समितीचे सदस्य बालाजी राठोड , शिवशक्ती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एल .के .जाधव, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्रीराम जाधव, एडवोकेट बालाजी राठोड एडवोकेट भगवान जाधव, पेशकार महेश राठोड, प्रा.संजय राठोड , गोविंदराव राठोड प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष देविदास राठोड यांची उपस्थिती राहणार आहे.
संत सेवालाल महाराज जयंती महोत्सवाची जयंतीची जय्यत तयारी चालू असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश राठोड, स्वागत अध्यक्ष माधव जाधव, कार्याध्यक्ष सुनील राठोड, सचिव सुधाकर पवार, उपाध्यक्ष सुधाकर राठोड ,जयपाल चव्हाण, संयोजक विश्वनाथ पवार, कार्यवाहक जगदीश राठोड, कोषाध्यक्ष प्रवीण पवार, सचिन प्रल्हाद जाधव ,सचिन रामराव जाधव, सचिन नामदेव जाधव, अंकुश राठोड ,विलास जाधव, रमेश राठोड, विकास पवार किरण आडे अनिल राठोड, रवी राठोड, विनोद राठोड, नितीन राठोड ,विजय चव्हाण, प्रकाश चव्हाण यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
तरी या जयंती महोत्सवात बंजारा समाजातील महिला भगिनी, सर्व समाज बांधव, कर्मचारी -अधिकारी व तरुण बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे .असे आव्हान कंधार पंचायत समितीचे सदस्य. उत्तम चव्हाण यांनी केले आहे.