जीवन संघर्षच्या वाटा व काटा* विचारधन

 

संघर्षाच्या वाटेवर जो चालणारा जग बदलत असतो .बारकाईने जर समाजाचे निरीक्षण केले तर आपल्या लक्षात असे येते. जीवनाच्या वाटेवर काटे असतातच, म्हणून प्रत्येकाला जीवन संघर्ष हा करावाच लागतो. सुखाच्या पाठीमागे दुःख उभी असते. आपले अस्तित्व टिकविण्यासाठी या पृथ्वीतलावर सर्व सजीवांना संघर्ष करावाच लागतो. त्यामुळे जीवनात वाटेबरोबर काटेही येतात-मानवी जीवनामध्ये व्यक्तीला अनेक वाटेने मार्गक्रमण करीत जावे लागते.प्रसिद्ध साहित्यिक इंद्रजीत भालेराव म्हणतात, काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता। चल माझ्या गावाकडे दोस्ता. म्हणून काही वाटा सुखाच्या तर काही वाटा दुःखाच्या असतात. सर्वच वाटा सरळ नसतात. काही वाटा डोंगरदऱ्यातून,चिखल पाण्यातून, जाणाऱ्या अवघड व त्रास देणाऱ्या असतात परंतु पलीकडे जाण्यासाठी त्या गरजेच्या असतात. म्हणून तुम्ही हिंमतीने त्या वाटेने जा. यश तुम्हाला नक्की मिळेल. वाटा आडवळणाच्या असल्या तरी त्या ओलांडून जावावे लागते. तरच तो मनुष्य यशस्वी होतो. भांडणांमध्ये अनेक जण म्हणत असतात .माझ्या वाटेला लागू नको? वाट ही एक संस्कृती आहे. तो एक विचार आहे.आम्ही सरळ मार्गी माणसे आहोत. असे काही जण बोलतात. म्हणून सज्जनहो. चांगल्याच वाटेने जा.
तुम्ही जर हिमतीने वागले तर तुम्हाला या जगात किंमत येईल. नाहीतर तुम्ही पळपुटे व्हाल. त्यामुळे तुम्हाला इज्जत राहणार नाही. आपल्या वर्तनातून, कर्तुत्वातून आपली ओळख सर्वांना व्हावी, आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. जीवन जगते वेळेस एकही क्षण वाया घालू नका. कोणत्याही क्षेत्रात गेले तर विरोधक असतातच म्हणून आपले कार्य अर्धवट सोडू नका. सर्व ठिकाणी जाऊन तुम्ही मोठे व्हायचे असेल तर तुम्हाला श्रम करावे लागतील. तेव्हा तुमचे जीवन सत्यम ,शिवम, सुंदरम होईल. स्वतःला लेखन, वाचन,चिंतन करून ज्ञान वाढवावे,आणि नेहमी माणुसकीची पेरणी करावी, मोह.माया, मत्सर, अहंकार या विकारापासून दूर राहावे. आपण काहीतरी समाजाचे देणे आहोत. म्हणून या मातीचे पांग फेडावे. जननी जन्मभूमी स्वर्गापेक्षा मोठी आहे. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत सर्वासोबत आनंदाने वागावे, भेटीगाठी, गळाभेटी करून घ्याव्यात.एका विचाराने राहावेत हसून खेळून मौजमजा करून जीवन जगावं .माजू नये,उतु नये ,घेतलेला वसा टाकू नये.असे काही ठिकाणी वाचले आहे. विचार सुंदर ठेवा. माणूस मेले की लोक जवळ सुद्धा येत नाहीत. त्याच्या शरीराला स्पर्श सुद्धा करत नाहीत. म्हणून गर्वाच्या भोवऱ्यात अडकू नका. खोटी श्रीमंती दाखवू नका. लाचारीचे जीवन जगू नका,कोणालाही भीक मागून नका, त्यामुळे तुमची इज्जत जाईल. घराण्याची शान कमी होईल. तुमचा आजचा संघर्ष तुम्हाला उद्याचे सामर्थ्य निर्माण करून देईल .त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल. आयुष्य हे अनमोल आहे ते सुखाने जगा, कष्ट करून मिळालेले समाधान जगावेगळे असते.म्हणून कष्ट करा. तुम्ही इतरांना दोन वेळेस धोका देऊ शकता? पण तिसऱ्या वेळेस तो तुम्हाला जबरदस्त धोका देणारच? हे लक्षात असू द्या. ज्याच्या मनात नेहमी तिरस्कार असतो तो माणूस जीवनात समाधानी नसतो, हिटलर शेवटपर्यंत सुधारला नाही आणि अनेक लोकांचा त्यांनी बळी घेतला त्यामुळे तो कायमस्वरूपी दुःखी झाला ,इतरांना नको त्या शब्दात बोलू नका, चांगला विचार करा . सुखदुःखात जे आपल्या सोबत असतात त्यांना कधीही विसरू नका. साधी राहणी असली तरी विचार उच्च ठेवा. वागण्यात नेहमी नम्रपणा असावा. दुसऱ्या बद्दल मनात अढी ठेवून वागू नका, म्हणून जिथे वाटा आहेत तेथे काटे आहेत, ते काटे साफ करूनच आपल्याला पुढे जीवनात जाता येते. नसता आपण वाट सोडून देऊन बाजूने चालला तर तुम्हाला अनंत अडचणी येतात. म्हणून काट्यांना घाबरू नका. काटे झाडा आणि पुढे जा तेव्हाच तुमचे जीवन सार्थक होईल. स्वार्थीपणाने वागून दुसऱ्याचे ओरबडून खाऊ नका. दुसऱ्याविषयी मनात करुणा, दया ,भावना असू द्या. परोपकार करा मनात मायेचा ओलावा असावा.भावना शून्य वागू नका. आनंदाने ज्ञान मिळवा. डोंगरदऱ्याखोऱ्या फिरवून निसर्गाचा आनंद घ्या, आपल्यावर ज्याने उपकार केले त्यावर निष्ठा ठेवा, निष्ठा घालून तुम्ही मोठे होत नाही, निष्ठा काय असते हे जाणून घ्या ,म्हणून आपण शूर आहोत, धैर्य दाखवावे या जगात चुकणार्‍यांना शिक्षा आहेच, असे समजू नका की आम्हाला कोणीच काही करू शकत नाही, म्हणून आयुष्यात लोकांची हांजी हांजी करून लाचारी पत्कारू नका. दुराभिमान अजिबात बाळगू नका .
हे सर्व सांगण्याचं कारण काय ?
तर सध्याला माणुसकी कमी होत आहे, कोणीच कोणाला विचारायला तयार नाही, म्हणून तुम्ही स्वच्छ मनानं तुमचं जीवन जगा, नवनवीन विचाराने मार्गक्रमण करा, मात्र भूमीचे व मातीचे ऋण फेडावे, ढोंग करणाऱ्या कोल्हाचे ऐकू नका, माकडे उड्या मारतात दरवर्षी घरे बांधू म्हणतात, आज पर्यंत त्यांनी घर बांधले नाहीत, कष्टाची फळे गोड व मधुर असतात इमानदार लाकूडतोड्या या बोधकथा तुम्ही शिकून घ्या, तरच आपण पुढे जाऊ शकतो, दिव्याने दिवा लागत जातो आणि सगळीकडे उजेडच उजेड होतो, म्हणून हे जीवन सुंदर आहे.
असे म्हटले जाते, या सुंदर जीवनाला गालबोट लागू देऊ नका, सज्जनहो त्यासाठी आपण आपली ओळख जगाला चांगल्या पद्धतीने दाखवा. कर्तुत्वांने मोठे व्हा, गाभाभूत घटकांचा अभ्यास करा ,श्रमप्रतिष्ठा, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन ,स्त्री पुरुष समानता एवढे जरी कळाले तरी तुमचे जीवन सार्थक व परिपूर्ण होईल ,जिथे आपली किंमत होते तिथे आवश्यक जा, आपल्या शब्दांला किंमत नाही, तेथे काही बोलू नका. आपण एखाद्या ठिकाणी गेल्यास तेथील लोकांना जर त्रास होत असेल तर तिथे जाण्याचं सुद्धा टाळा,जास्त संकटे येऊ लागल्यास दोन पावलं माघार घ्या. काही फरक पडत नाही. *सीर सलामत तो पगडी पचास*
अटीतटीची लढाई करून जीव गमावू नका. तह करून मार्ग काढा. ओव्हरटेक करताना विचार करा हे जीवन पुन्हा नाही. सर्वांसोबत होता होईल तेवढे गोड बोलून काम करून घ्या. तिरस्काराने खुन्नसपणाने कामे होत नाहीत, येशू ख्रिस्तांच्या पायावर खिळे जरी ठोकले तरी त्यांना हे प्रभू यांना क्षमा करा. असे म्हटले,हे वाक्य लक्षात असू द्या. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर सुद्धा मारेकरी आले होते त्यांनी त्यांचे विचार परिवर्तन केले म्हणूनच ते आज महात्मा झाले हे तुम्ही ओळखा मोठे होण्यासाठी मारामारीव भांडणे करून तंटे ,वाद विवाद करून पुरस्कार मिळत नाहीत. शांत राहून अभ्यास करून चिंतन, मनन करून तुम्ही पुरस्कार मिळू शकता, व्यासपीठावर बसू शकता

,चांगल्यांच्या रांगेत जाऊ शकता म्हणून कार्य करीत रहा, चांगल्या वाटेने जा, काट्याशिवाय वाट नाही, श्रमा शिवाय प्रतिष्ठा नाही गुलाबाला सुद्धा काटे आहेत तरी आपण गुलाब तोडून घेतोच,म्हणून तर गुलाब हा फुलांचा राजा आहे. जिथे मोठेपणा आहे तेथे कष्ट सुद्धा आहेत. कष्टाविना फळ नाही, कष्टाविना राज्य नाही, टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण मिळत नाही, म्हणून सज्जनहो ,चांगले वर्तन करा, दिसामाशी काहीतरी लिहीत राहा, अशी शर्यत लावा की दुसऱ्याला धक्का न लावता जिंका ,दुसऱ्याला धक्का देऊन आपण जिंकू शकत नाही. त्यासाठी कार्य करीत रहा. फळ मिळत राहतील.अभ्यास करीत रहा यश हमखास मिळत राहील. उणे -दुणे काढून भांडणं करून कोर्टकचेऱ्या करून आज कितीतरी जण वेळ वाया घालून तुरुंगामध्ये आहेत. दररोज पेपर मधून आपण अनेक बातम्या वाचतो, छोट्या छोट्या गोष्टीवरून संयम न पाळता दोन वर्षाची तीन वर्षाची शिक्षा भोगत आहेत. म्हणून संयम पाळा, जमत नसेल तर बोलू नका .बोलून वाद करू नका. दुसऱ्याच्या मोठ मोठ्या इमारती बघून मनात वाईट विचार आणू नका. तुम्ही सुद्धा मोठे डिगऱ्या करून नोकरी लावून घेऊन त्यांच्या पेक्षा इमारती मोठ्या बांधा, स्वाभिमानाने जगा दुसऱ्यांनी ओढलेल्या रेषा पुसू नका, तुमच्या रेषा त्या रेषेच्या खाली मोठ्या ओढून नाव कमवा, मानवतावादी विचारांने गुण्यागोविंदाने वागावे,ऐकावे जनाचे करावे मनाचे, कारण लोक कोणालाही नावे ठेवतात. त्यांचा फायदा संपला की आपली चेष्टा करतात हे कटू सत्य आहे. शारीरिक लढाई पेक्षा विचारांची लढाई ही महत्त्वाची असते. विचाराच्या लढाईतून एकमेकाचे गुणदोष कळून येतात. आजच्या लेखांमध्ये एवढेच सुखी जगा ,सुखी रहा, दुसऱ्यांना सुद्धा सुखाने जगू द्या. ही अपेक्षा

शब्दांकन
*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष :विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *