कंधार : (दत्तात्रय एमेकर गुरुजी )
आपल्या भारत देशात पौराणिक अन् ऐतिहासिक अनेक संस्कृति जतनाच्या लोककला अस्तित्वात आहेत. कांही कला इतिहास जामा झाल्या पण उर्वरित भारतीय लोककला आजच्या संगणक युगातही आपले अस्तित्व टिकविण्यास धडपडत आहे
बारा बलुतेदार पध्दत भारतात अस्तित्वात होती त्यात हा कृष्णभक्ती करणारा समाज आपल्या कलेवर दान पावल म्हणत दारोदार दिवाळी सणाच्या नंतर प्रत्येक घरी जावून त्यांच्या वाडवडीलांच्या गीतातून उध्दार करुन पंढरीच्या पाडूरंगाचे अभंग, गवळणी आणि देवी-देवतांच्या नामावलीचे गीत गात टिंलम् टिंलम् टाळवाजवित आपापली गावे मागुन उपजीवीका करतात.डोक्यावर सुंदर व आकर्षक मोरांच्या पिसांची टोपी परिधान करुन पायघोळ अंगरखा किंवा कमीज आणि धोती,कमरेला शेला गुंडाळून त्यात बासरी,मंजीरी अशी वाद्य खोवून एका हातात टाळ, काखेत एक दान घेण्यासाठी झोळी असा पोशाख परिधान करून दान पावल्याची गीते सादर करून आपली ओळख ” वासुदेव “नावाने होते.
या लोककलावंतास शासन दरबारी राजाश्रय मिळणे ही येत्या काळाची गरज म्हणावी लागेल. या वासुदेव लोककलावंतास मानधन मिळणे म्हणजे लोककलावंतास प्राणवायू पुरविणे अत्यंत गरजेचे आहे.अशा वासुदेव लोककलावंता सोबत एक सुंदर फोटो घेण्याचा योग हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमादिनी ही छबी घेण्याचा योग श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार ज्ञानालयात आला होता.त्यात लोककलावंत आदरणीय शाहीर पिराजीराव डोईजड साहेब,आदरणीय यशवंतराव घोगरे साहेब उत्कृष्ट ढोलकी पटू वासुदेव लोककलावंत माधवराव रोडगे साहेब आणि विष्णुकांत पेंढारे साहेब