ओळखलत का सर मला’? मराठी भाषा गौरव दिन : 27 फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते

 

 

मराठी साहित्य क्षेत्रातील कवीचे कवी म्हणून ओळखले जाणारे कुसुमाग्रज यांचा आज, 27 फेब्रुवारीजन्म दिन आहे. त्यांना जननी व जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा महान वाटत होती. क्रांतिकारकांना त्यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातून एखादा नवीन कवी काव्य घेऊन घरी आला असेल तर ते वाचून पहात. कधी कोणाचा त्यांनी अपमान केला नाही. चार शब्द समजावून सांगून त्यांच्या मनात परिवर्तन करत असत. कधीही कोणाला वाईट वाटेल असे ते बोलले नाहीत. त्यांनी केलेल्या मराठी साहित्यातील कार्याचा आढावा आपण या लेखात करून घेऊ त्या निमित्ताने लिहिलेले दोन शब्द. …
आधुनिक मराठी साहित्यातील कुसुमाग्रज हे एक समाजाभिमुख व प्रतिभावंत लेखक आहेत.

त्यांच्या लेखणीतून त्यांनी समाजा कडून आपुलकी मिळवली.प्रत्येक व्यक्तीला वाटत असे की ते आपलेच आहेत असे प्रत्येकाच्या मनात एक गोडवा उत्पन्न केले, समाजात जीवन जगताना एक चांगला व्यक्ती म्हणून ते नावारूपाला आले .तळागाळातील माणसापर्यंत त्यांचे विचार पोहोचले. आज भारतातील अनेक विद्यापीठात यांनी लेखन केलेल्या साहित्याचा अभ्यास सुरू आहे .जीवनदृष्टी व वाड;मय दृष्टी यांची एकात्मता साक्षात निर्माण करणारा साहित्यिक ,लेखक म्हणून समाजात त्यांचे स्थान उठून दिसते तर त्यांच्या साहित्याचा अभ्यास जवळजवळ प्रत्येक विद्यापीठात विद्यार्थ्यांनी ठेवलेला आहे. भगवद्गीता, संत तुकाराम महाराजांचे काव्य. कालिदासाचे मेघदूत आणि उमर खय्यामची रुबाईत फार मोठा संस्कार कुसुमाग्रजांच्या कवी मनावर आहे .ससा जरी चपळ असला तरी शर्यत ही कासवानी जिंकली आहे. जिद्दी माणसे जिद्दी मिळवतात मग प्रसिद्धी आपोआप पाठीमागे चालत येते. असे ते म्हणतात सामाजिक अन्याय व विषमता या विषयावर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लेखणीतून कठोर टीका केली .साहित्यिकांनी सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे.

केशवसुत व कुसुमाग्रज यांच्या सामाजिक विचारांची नाते परस्पर संबंध जुळणारे आहे. साहित्य निर्मिती ही त्यांची जीवननिष्ठा ठरली आहे. बोले तसे चाले। त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे कुसुमाग्रजांचे जीवन आणि साहित्य यांचे अदै्त नाते आहे. कुसुमाग्रजांच्या नंदनवनात मानवतेला, करूणेला स्वातंत्र्याला आणि सामाजिक समानतेला अनन्य साधारण स्थान आहे.
कुसुमाग्रजांनी लिहिलेली कणा ही कविता आजही सर्वांना ताजी व मनाला आधार देणारी वाटते.

युवकांना तर ती स्फूर्ती व प्रेरणा देणारी ठरली आहे. त्या विद्यार्थ्यांची झालेली हुबेहुब अवस्था या कवितेत रेखाटले आहे, त्यांची कविता म्हणजे मराठी भाषेचा दागिना आहे ते कवीचे कवी आहेत .म्हणून त्यांचा जन्म दिन27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून आज सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.1987 मध्ये लिहिलेल्या नटसम्राट नाटकाला साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ देण्यात आला, मराठी भाषेला समृद्ध करणारे ते साहित्यिक आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक वीरांनी आपले बलिदान दिले. इंग्रजांनी त्यांना फसवावर लटकवले त्यांच्या बलिदाना तून आपण स्वतंत्र झालो. म्हणून एका कवितेतून कुसुमाग्रज म्हणतात. तुम्ही जातीभेदा विरुद्ध कायदे केले आहेत. परंतु प्रत्यक्षपणे जातीभेद आहेतच. यासाठी तुम्ही तुमच्या मनातून जातीबद्दलचे विषमतेचे विष काढून टाका.

तरुणाचे बळ हे खरे देशाचे बळ आहे. देशाचा विकास करण्याची जबाबदारी तरुणांची आहे.तरुणच देशाचा विकास करू शकतात. परंतु सध्याचा तरुण वर्ग करमणुकीच्या गटारगंगेत वाहून जातो आहे , आणि तरुण व्यसनामुळे वेडे झाले आहेत. तरुणांच्या हाती जोपर्यंत जिद्द. चिकाटी अपार मेहनत. अहोरात्र कष्ट करण्याची तयारी असल्यास तुमचे कार्य अतुलनीय होईल.

स्वालंबन, स्वाभिमान ,स्वाध्याय व स्वातंत्र्य ही यशाची चतु:सूत्री आहे. कधीही यशाची वाट पाहत बसू नका. प्रयत्न करत रहा. विश्वास ही सर्व यशाची सर्वात मोठी पुंजी आहे. यशाची पायरी चढताना पराभवाचे सामना करावा लागतो. प्रत्येक जण आयुष्याच्या शेवटपर्यंत विद्यार्थी असतो. नवनवीन ज्ञान आत्मसात करा. अशी संजीवनी कवी कुसुमाग्रज आपल्या विद्यार्थ्यांना अध्यापनातून देतात म्हणूनच ते आज सर्वांच्या हृदयात आहेत *ज्ञानपीठ* विजेते असून देखील कधी त्यांना अहंकार दाखवलेला नाही. मोठ्या लोकापेक्षा साधी भोळी माणसं जास्त जवळची वाटायची, बारा बलुतेदार लोकांसोबत त्यांचे मैत्रीचे संबंध निर्माण केले होते. स्वतःचा अपमान झाला कोणी मुद्दाम हून केला ;तरी त्यांनी विरोध केला नाही अनेक साहित्यिक त्यामुळेच त्यांना तुकाराम म्हणून संबोधतात. त्यांनी अनेक कवी, लेखक साहित्यिक घडविले .पेपरला लेख पाठविल्यानंतर ते लिहीत असत, संपादक साहेब पसंत आला तरच छापावे असे रोखठोक बोलणारे कुसुमाग्रज होते. कधी त्यांनी कोणाचे काही फुकट घेतले नाही. नटसम्राट लिहून लोकांच्या घराघरात ते पोहोचले *कोणी घर? देता का घर?* हे वाक्य तर महाराष्ट्रातल्या अनेक व्यक्तीला तोंडपाठ झाले आहे. एके दिवशी कुसुमाग्रज विद्यार्थ्यांना म्हणाले, “यशाचे शीतल चांदणे तुम्हाला हवे असेल तर प्रयत्नाचा चंद्र अखंड ठेवलाच पाहिजे, जीवनात तुम्हाला काही साध्य करायचं असेल तर दोन गोष्टीची आवश्यकता असते.

एक ध्यास व दुसरा अभ्यास होय.” स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटली नाही. यशाची पायरी चढताना पराभवाचाही सामना करावा लागतो. पराभवाने माणूस कधीही संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. ज्ञान हे वाहत्या पाण्याच्या झऱ्यासारखे असते. म्हणून ते निर्मळ ठेवण्याचा सतत प्रयत्न करावा असे मार्गदर्शन ते समाजाला करतात. प्रखर शक्ती ही प्रोत्साहन देणारी व ध्येयापर्यंत
नेणारी ठरते. अशा प्रकारची अमृतवाणी ते आपल्या विद्यार्थ्यांना देतात, त्यामुळे आजही त्यांच्या साहित्याचा अभ्यास सर्व विद्यापीठात केला जातो .

आजही त्यांची *कणा* ही कविता मराठी माणसाच्या मनात गुणगुणत असते,
*ओळखलत का सर मला*
पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले,
केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला
बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली
गेली घरट्यात राहून’
या कवितेतून आज आपल्याला बरंच काही शिकायला मिळते. म्हणून मराठी भाषा साठी कुसुमाग्रजांनी केलेला कार्य अजरामर आहे त्यासाठी सर्वांनी आपण मराठी भाषेची सेवा करावी. संवर्धन करावं ,मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी मराठी साहित्य वाचन करणे गरजेचे आहे ,अखिल भारतीय साहित्य संमेलन दरवर्षी भरवले जातात .त्यातून मार्गदर्शन केलं जाते ते मराठी माणसाच्या घराघरापर्यंत पोहोचावेत,मराठी साहित्याकडे तरुणांने पाठ फिरू नये. बऱ्याच जणांना मराठी भाषा म्हटलं की हसू येते,

कारण सध्या जीवन जगण्याची भाषा इंग्रजी झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत आहे .ते होता कामा नये असे मला वाटते, देशप्रेम,राष्ट्रप्रेम यांचे अनेक मोहक रूप तात्यासाहेबांनी कवितेच्या माध्यमातून मांडले, विपुल अशी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली. अनेक कथा ,कादंबऱ्या, कविता लिहिल्या, नाटके ,एकांकिका वेगवेगळे प्रबंध लिहून मराठी भाषा समृद्ध केली ,अशा या महान साहित्यिकांचा मृत्यू 10 मार्च 1999 रोजी झाला, शरीराने ते स्वर्गवासी झाले तरी त्यांचे विचार सदैव प्रेरणादायी आहेत,त्यांच्या विचाराचा जागर करून आपण सर्वांनी मराठी भाषा समृद्ध करू या, तेव्हाच त्यांना अभिवादन केल्याचे सार्थक होईल

*शब्दांकन*
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत* अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *