धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे )
येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात आज दि 27 फेब्रु 24 रोजी सकाळी 10 : 30 वाजता शैक्षणिक वर्षे 2023 24 च्या दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय भगवान सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ शिवाजीराव गुट्टे उपस्थित राहणार आहेत. सुप्रसिद्ध ग्रामीण कवी अरुणकुमार पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.तर समारोप समारंभास मा श्री भाऊसाहेब खंदारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक,किनगाव ,उपस्थित राहणार आहेत.
वार्षिक स्नेहसंमेलनास विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे .असे आवाहन प्राचार्य डॉ टी एल होळंबे, प्रा डॉ टी व्ही चाटे प्रा डॉ रमाकांत गजलवार , प्रा भगवान आमलापुरे, प्रा अविनाश मुंडे, प्रा डॉ सौ शिंदे एस वाय, प्रा डॉ सौ एस डी मुंडे यांनी केले आहे.