Post Views: 65
नांदेड – सामाजिक प्रबोधनाचे महाउपासक संत गाडगेबाबा यांना जवळ्यात चाचा नेहरू बाल सभेने अभिवादन केले तर वार्षिक तपासणी पथकाने संत रविदासांना अभिवादन केले. यावेळी सुनेगाव बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सरस्वती आंबलवाड, केंद्रप्रमुख नागोराव जाधव, जाधव बी एस ( मु. अ. शिवणी जा. ), तिडके पी. एम. (प्रा. शा. धानोरा म . नरवाडे ए. एच. (केंद्रीय मु. अ. शेवडी बाजीराव), कलने एस. एम. ( प्रा. शा. पळशी), कोल्हे आर बी (प्रा. शा. बेटसांगवी २), जोशी ए .व्ही. (प्रा शा शेवडी तांडा), महेश चंदे, शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार, हैदर शेख, मनिषा पांचाळ, मारोती चक्रधर आदींची उपस्थिती होती.
संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चाचा नेहरू शालेय बाल सभेने संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व शालेय परिसरात स्वच्छता करून त्यानंतर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे सहा संदेश सांगितले. तसेच ते दैनंदिन जीवनात अवलंबिण्यात येण्याच्या सूचना दिल्या. मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी संत गाडगेबाबा यांनी केलेल्या कीर्तनातून सामाजिक प्रबोधनाचे कार्य या विषयावर माहिती दिली. दुसऱ्या दिवशी श्रीमती आंबलवाड एस. एन. यांच्या नेतृत्वाखालील तपासणी पथकाने शालेय वार्षिक तपासणी मोहिमेअंतर्गत शाळेत उपस्थित झाल्यानंतर संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पथकाने शालेय गुणवत्ता, शालेय कामकाज, उपक्रम तसेच परसबागेची पाहणी केली.