कंधार ;
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राचे विख्यात साहित्यिक आहेत. त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून दीन, दलित, दुर्बल, शोषित, श्रमिकांचे दुःख समस्या सर्वांपुढे मांडण्याचे कार्य केले आहे.संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम मध्ये आपल्या कला, शाहिरीच्या माध्यमातून योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदाना बद्दल भारत सरकारने शताब्दी वर्षात अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न उपाधीने सन्मानीत करा अशी मागणी निवेदनाद्वारे संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक साईनाथ मळगे यांनी दि.२३ जुले रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी क्रांतीची मशाल पेटवली आहे. स्वतंत्रतापूर्व तथा स्वतंत्रता प्राप्तीनंतर, निरनिराळ्या राजनीतिक तसेच सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली होती. श्रमिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जिवन वेचले. २०२० हे वर्ष लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त टपाल तिकीट प्रकाशित करून आदरांजली दिली आहे. तरी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्त त्यांना मरणोत्तर “भारतरत्न” या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करून त्यांच्या समर्पित जिवन कार्याचा गौरव करावा अशी महाराष्ट्राच्या तमाम जनतेची मागणी आहे. लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर “भारतरत्न” या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करून त्यांना आदरांजली प्रधान करावी अशी मागणी निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक संस्थापक साईनाथ मळगे यांनी केली आहे.