सुप्रसिद्ध चित्रकार विजयसिंह ठाकूर यांनी काढलेले पेंटिंग्स अतिशय उच्च प्रतीचे असून नांदेडच्या चित्रकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी लवकरच नांदेडमध्ये कलादालन सुरू करण्यात येईल असे प्रतिपादन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या ” विजय आविष्कार ” प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले
विजयसिंह ठाकूर यांच्या कुंचल्यातून साकार झालेल्या ६० कॅनव्हास पेंटींग प्रदर्शनाचे रोहित हॉटेलच्या हॉलमध्ये आयोजन केले होते. पोतदार कॉलेजचे संचालक प्रा. चंद्रकांत पोतदार यांनी अध्यक्षस्थान भूषविले. व्यासपीठावर चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र कांबळे, डॉ.सुनील वझरकर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट, कामाजी सरोदे, तिरुपती भगनुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक करताना ॲड. ठाकूर यांनी कार्यक्रम घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. यावेळी मार्गदर्शन करताना खा. चिखलीकर असे म्हणाले की, विजय सिंग ठाकूर यांनी काढलेली चित्रे अप्रतिम दर्जाची असून नांदेडकरांनी आवर्जून प्रदर्शनाला भेट द्यावी.
यावेळी विजयसिंह ठाकूर यांना महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे यांच्या तर्फे राज्यस्तरीय “कलातपस्वी “हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना विजयसिंह असे म्हणाले की, पेंटिंग विक्रीतून जमा होणारी रक्कम दिलीपभाऊ ठाकूर यांच्या समाजकार्यासाठी देण्यात येईल. प्राचार्य पोतदार यांचे याप्रसंगी समयोचित भाषण झाले.या प्रदर्शनामध्ये आयोध्या येथील श्रीरामाची नवीन मूर्ती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्री गणराज ,श्री विठ्ठल, छ .शिवाजी महाराज,महात्मा गौतम बुद्ध यांच्या शांती मुद्रा अशा विविध ६० वैश्विक प्रतिभेची अमूल्य चित्राकृती ठेवण्यात आल्या होत्या .या अभिजात चित्राकृती पाहून कलारसिक तृप्त झाले. उद्घाटन प्रसंगी माजी पोलीस उप अधीक्षक सुभाष राठोड, सुमती व्याहाळकर, प्रतिष्ठित समाजसेविका स्नेहलता जायस्वाल, भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख धीरज स्वामी, योगेश सुतारे,मुख्याध्यापीका सौ.अनघा सुधीर कुरुंभट्टे ,सौ. शोभा ठाकूर,कु.साक्षी ठाकुर,सौ.नेहा चंदेल, जे.पी.मुढे,सौ. ठाकूर,डि,जे,ढवळे,टी. पी. वाघमारे,संतोष चौहान,संजय जाधव,गोविंदवार,आरलवाड बालाजी, सतिश सुर्यवंशी,मंदे सतिष,रवी मोतकुरवार,मोहनराव कुंटुरकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहीदास कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन भोकरदन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रघुवीरसिंह चंदेल यांनी केले.
दोन दिवसाच्या प्रदर्शनाला नांदेडकरानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शेकडो कलारसिकांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी अर्जुनसिंह ठाकूर,जगदीशसिंह ठाकूर, महेंद्रसिंह ठाकूर यांनी परिश्रम घेतले. विजयसिंह ठाकूर यांनी काढलेल्या अप्रतिम कॅनव्हास पेंटिंग कोणाला विकत घ्यायचे असल्यास त्यांनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.