कंधार शहरातील डॉ अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्थलांतरीत न करता दर्शनीय भागात बसवा – तहसिलदारांना मागणी

 

दिनांक १२.०१.२०२४ रोजीचा नगर परिषद कार्यालय कंधार यांनी ठराव क्र. ७१० घेतला तो तात्काळ तहकुब करा

कंधार  :  ( संतोष कांबळे )

कंधार शहरातील साहित्यरत्न लोकशाहिर डॉ. अण्णाभाऊसाठे यांचा पुतळा/स्मारक स्थलांतरीत न करता मुळ ठिकाणी आहे त्याच ठिकाणी पूर्ण आकृती करुन दर्शनीय भागात बंसवण्यात यावा तसेच नपा प्रशासन दिनांक १२.०१.२०२४ रोजी पुतळा/स्मारक स्थलांतर करण्यात यावे यासाठी जे ठराव क्र. ७१० हा तात्काळ तहकुब करण्यात यावा यासाठी मातंग अस्मीता संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य कंधार यांच्या वतीने कंधार तहसिलदारांना निवेदन देण्यात आले

यासाठी मातंग अस्मीता संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य कंधार तालुका अध्यक्ष बालाजी माधव बसवंते यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. तरी मा. साहेबांनी कार्यवाही करण्यात यावी ही नम्र विनंती. अन्यथा मातंग आरिमता संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर आंदोलने करण्यात येतील याची प्रशासनाने दखल घ्यावी ही नम्र विनंती.

 

नागेश महाराज घोडजकर मास सं. उपजिल्हाध्यक्ष नांदेड

बालाजी बसवंते

मास सं. तालुका अध्यक्ष कंधार

 

बळीराम वाघमारे (किरण) मास सं. का.आ. तालुका अध्यक्ष कंधार

 

साहेबराव घोडेजकर

मास. सं. तालका सचीव कंधार प्रतिलिपी, यांनी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *