परिश्रमातून पुढे आलेली माणसे समजूतदार असतात त्यांच्या जाणिवा प्रगल्भ झालेल्या असतात, सामाजिक ,शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात मानाची पदे लाभूनही काही माणसं साधी, सरळ मार्गी जमिनीवर पाय ठेवून व्यवस्थित चालणारी असतात. कसल्याही पद्धतीचा अहंकार नाही. साधी राहणी व उच्च विचारसरणी असते, नेहमी समाजाचं कल्याण व्हावं अशी अपेक्षा ठेवणारे व्यक्ती समाजात मोठी होत असतात.
सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्याचा लेखाजोखा या लेखात घ्यायचा आहे..
त्यानिमित्ताने केलेला हा लेखन प्रपंच…..
भविष्याचा अचूक वेध घेत वाटचाल करणाऱ्या व्यक्ती बोटावर मोजण्या इतक्याच असतात. अशा व्यक्तीमध्ये अग्रणीय नाव असणारे व्यक्तिमत्व म्हणजे उपेरबेडच्या संघर्ष कन्या देशाच्या15 व्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मूर्मू ह्या आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश प्रजासत्ताक झाला आणि प्रजेच्या हाती सत्ता सुरू झाली त्यामुळे राष्ट्रपतीपद उदयास आले,पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मूर्मू या कर्तुत्वान महिला आहेत.काही माणसं स्व कर्तुत्वावर मोठी झाली आहेत. त्यांचा जीवन प्रवास खडतर होता,
संघर्षाच्या आणि संकटाच्या वाटा त्यांच्यासाठी काटेरी होत्या, नेहमी त्यांची सत्वपरीक्षा घेत होत्या, तरीही या संघर्ष कन्येने संपूर्ण संकटावर मात केली, प्रचंड ध्येयवाद, दुर्दम्य इच्छा शक्ती अथक परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर त्यांनी मोठी झेप घेतली, आणि त्या देशाच्या राष्ट्रपती झाल्या, संघर्षाच्या वाटेवर चालून त्यांनी फुलाच्या पायघड्या तयार केल्या ,त्यामुळे त्यांचा सुगंध सर्वत्र आज दरवळत आहे. हे मला अभिमानाने सांगावे वाटते ,ही गोष्ट आपल्या तरुण-तरुणींना प्रेरणादायी ठरली आहे , संकटाची मालिका त्यांच्यावर येऊन घरातील तीन व्यक्ती मृत्यू पावले, पण त्या थोड्या सुद्धा खचल्या किंवा डगमगलेल्या नाहीत, जीवनातील वास्तवता लक्षात घेऊन ध्येयवादी प्रवृत्तीने कार्य करणाऱ्या व येणाऱ्या अडचणीला हसत हसत त्या तोंड देत आहेत.
वास्तवता स्वप्न ,सृष्टी व हास्यरस या तिन्ही गोष्टीचे एकत्र मिश्रण म्हणजे ज्ञान होय, हे जीवनाचे गणित आज मान्य आहे, जीवनात अनेक सुखाचे क्षण येतात ते सूर्याच्या कोवळ्या किरणासारखे सतेज असतात, नंतर भडक होतात तसे त्यांची जीवन तेजोमय झालेले आपल्याला दिसते, महामहीम द्रौपदी मूर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओरिसातील मयूरभंज जिल्ह्यात संथाळ या आदिवासी कुटुंबात झाला, त्यांच्या वडिलांचे नाव नारायण दुडू होते, महाविद्यालयीन शिक्षण भुवनेश्वर मधील रमादेवी महिला महाविद्यालयात झाले, पुढील काळात त्या सहाय्यक लिपीक झाल्या, त्यानंतर त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या, राजकारणात त्या 1997 मध्ये प्रवेश केल्या, सुरुवातीला नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या, त्यानंतर रायरंगपूरच्या आमदार झाल्या. पुढे त्यांना बीजेडी सरकार मध्ये मंत्रिपद मिळाले आणि *नीलकंठ पुरस्काराने* त्यांना सन्मानित करण्यात आले, ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास होत नाही म्हणतात.
तसे त्या झारखंडच्या पहिल्या महिला नवव्या राज्यपाल म्हणून, 18 मे 2015 ते 12 जुलै 2021मध्ये कार्यरत होत्या,. त्यानंतरच्या काळात त्या भरघोस मतांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या, त्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत हा विजय संपूर्ण आदिवासी समाजासाठी व भारतीयांसाठी परिवर्तनवादी ठरला.
शिक्षणात किती सामर्थ्य असते हे या विजयाने दाखवून दिले. म्हणून शिक्षण शिका शिक्षण नाही शिकले तर इतके अनर्थ एका अविद्याने केले, असे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात श्रमाला फळ मिळाले,भेदभावांचा अंत झाला. जातीयता येथे नष्ट झाली. कर्तुत्वाला फळे आली. जे कर्तृत्व करतात ते खरोखरच यशोशिखरावर जातात, अशी जनसामान्यांमध्ये चर्चा होऊ लागली, म्हणूनच कर्तुत्वान महिलांची संघर्षगाथा आपण अभ्यासत व शिकत आहोत, व्यक्ती कोणत्या जातीत जन्मला हे महत्त्वाचे नसून त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आम्हाला आजही प्रेरणादायी आहेत, म्हणून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे सुद्धा आम्हाला कळाले म्हणून महिला दिनाच्या निमित्ताने अशा गुणवंत व कर्तुत्वान महिलांचे प्रेरणादायी विचार आपण समाजा समोर ठेवावेत, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण पुढे जावेत, त्यासाठी लेखन ,वाचन, चिंतन, संभाषण फार महत्त्वाचाे आहे.
घरामधील त्यांची मुले, पती वेगवेगळ्या कारणामुळे मृत्यू पावले त्यांनी त्यांचे दफन घरामध्येच केले, आणि त्या ठिकाणी आज विद्यालय बांधण्यात आले, एका बाजूला आपण अंधश्रद्धा पाळतो तर दुसऱ्या बाजूला त्या घराला विद्यामंदिर म्हणून नावारूपाला आणले, हे येथे सांगावयाचे आहे. आपल्या जीवनभराच्या प्रवासात त्यांनी कधीही कोणावर रागावलेल्या नाहीत.
पाठीमागचा इतिहास पाहिल्यानंतर त्यांची कर्तुत्व अतिशय मोठी आहेत. इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हे कार्य केलेले आहे. वास्तविकता त्यांच्याकडून आपला शिकता येईल. कष्टकऱ्यांच्या ,कामकरी,लोकांच्या जीवनाची गाथा काय असते? हे त्यांनी सांगितलेलं आहे. जाणिवांची प्रगती आणि समाजाची पुनर्वस्था ,पुनर्रचना यासाठी शिक्षण हे एक मूलभूत साधन आहे. म्हणून शिक्षण शिका? असे त्यांना सांगायचे आहे त्या नेहमी पुस्तके जवळ ठेवतात. आणि वाचन करत असतात. हे या ठिकाणी आवर्जून सांगावे वाटते.
आजकालचे तरुण म्हणतात ‘आम्हाला वेळ मिळत नाही.
वाचन करण्यासाठी ज्या पदावर आज त्या आहेत ते पद सांभाळून सुद्धा वाचन करीत असतात हे वाखाण्याजोगी गोष्ट आहे, *यत्र नार्यस्तु पुजन्यते ।रमते तत्र देवता।* जिथे स्त्रिया पूजनीय होतात, तेथे देवत्व प्राप्त होते असा संस्कृत श्लोक म्हटला जातो. ते सर्व वास्तविक आहे ज्यांना आईचे बहिणीचे महत्त्व कळाले ते यशस्वी झाले, पत्नी ही क्षणाची असून अनंत काळाची माता आहे. असे विचारवंतांनी म्हटलेले आहे.म्हणून महिलांचा नेहमी आदर करायला शिका ,महिला या कोमल आहेत पण कमकुवत नाहीत. याची जाणीव असू द्या .प्राचीन काळातील महिला आणि आजची 21 व्या शतकातील महिला यामध्ये जमीन, अस्मानचे फरक आहे,
त्यासाठी महिला या अबला नसून सबला आहेत .हे तुम्ही लक्षात घ्या.
आज सर्वत्र शैक्षणिक वातावरण तयार झालेले आहे ,त्यामुळे खूप मुली शिक्षण शिकत आहेत, मोठमोठे पद पादाक्रांत करीत आहेत. शिक्षण,क्रिकेट, ऑलिंपिकच्या स्पर्धा, गिर्यारोहण, राजकारणातील सर्वच पदे या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांच्या यशाच्या संघर्ष गाथा आपण अभ्यासणार आहोत. आठ मार्च महिला दिनाच्या निमित्ताने आपण काही शूरवीर ,रणरागिणी ,दुर्गा महिलांची माहिती पुढील लेखात घेणार आहोत,
#Dropadi marmu #president of India
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी, ता. मुखेड