लाईनमन बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर 4 मार्च लाईनमन दिवस म्हणून कंधार उपविभागात मोठ्या उत्साहाने साजरा

 

कंधार;    (  दिगांबर वाघमारे )

लाईनमन हा महावितरण मधील अत्यंत महत्त्वाचा घटक असून ऊन, वारा, पाऊस तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात ग्राहकांना अखंड व सुरळीत सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असतात.
महावितरण मधील लाईनमन हा रोबोट बनला असून कोणत्याही काम असो लाईनमन ते जबाबदारीने पार पडणारच.
अशा प्रकाशदुतांचा आज सोमवार दि. 4 मार्च रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान हार व फेटा घालून उपविभागीय अधिकारी श एस के राऊत यांचे मार्फत सत्कार करण्यात आला.

त्यावेळी तालुक्यातील सर्व जनमित्र,कुरुळा शाखाधिकारी श्री.जांभुळे साहेब ,बारुळ शाखाधिकारी श्री.नरवाडे साहेब,कंधार शाखाधिकारी श्री.नरोटे साहेब ,पेठवडज शाखाधिकारी श्री.आतनुरे साहेब हजर होते.

तसेच कंधार शहरात सर्व जनमित्र व अधिकारी यांनी वीज सुरक्षा, वीज बचती बाबतीत रॅली काढून जनतेमध्ये जनजागृती केली व ग्राहकांना ऑनलाईन बिल भरणे बाबत मार्गदर्शन केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *