हा विषय माझे वाचक , चाहते मा. श्री. नारायण पाटील पोहेकर यांनी दिला आहे.. त्यांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते.
आपण आधी करावे की करु नये हे पाहु..नंतर का करतात याची कारणे पाहुयात.. मी लिहीलेली बियॉन्डसेक्स ही कादंबरी या विषयावरच आहे.. जरुर वाचा.. शास्त्रानुसार विवाहबाह्य संबंध हा व्यभिचार समजला जातो म्हणजेच काय तर करु नये पण तरीही बरेच जण करतात.. प्रेम करायला परवानगी आहे पण शारीरिक सुखाला नाही..
जे करतात ते का करत असावेत त्याची अनेक कारणे आहेत.. सगळ्यात आधी कोणीही कोणाच्या आयुष्यात विनाकारण येत नाही तर त्याला गेल्या जन्माची , कर्माची जोड असते.. कोणी काही काळासाठी सोबत असतो तर काही जण बरेच वर्षे आपल्या सोबत रहातो.. आपण रोज करत असलेल्या इच्छा याही त्याला कारणीभुत आहेत कारण आपले शब्द , आपल्या मागण्या हे सगळं त्या ब्र्ह्मांडात स्टोअर होतं जसं मेमरी कार्ड मधे डेटा स्टोअर होतो तसच .. आणि तेच आपल्याकडे अशा नात्याच्या रुपात परत येतं.. उदाहरण घ्यायचे झाले तर , तु भेट मग बघतोच तुझ्याकडे म्हणजेच काय तर ही सुडाची भावना झाली.. कदाचित तो सुड घ्यायला ती व्यक्ती पुन्हां तुमच्या आयुष्यात येते आणि मग आपण म्हणतो की , मी तर याचं काहीच वाईट केलं नाही मग तो असा का वागला ??.. तेव्हा तो हे विसरलेला असतो की ती त्याचीच इच्छा होती म्हणुन शब्द जपून वापरावेत.. प्रेमच करायचय तर भगवंतावर करा.. जीव लावायचाय तर त्याला लावा.. तो आपल्याला सगळं देतो.. कालच्या लेखात मी १८ व्या अध्यायातील ६६ व्या श्लोकाचा उल्लेख केला आहे.. तो समजुन घ्या..
काही जणाना घरी हवं तसं शारीरिक सुख मिळत नाही म्हणुन ते अफेअर करतात.. काहीना घरी मिळतं तरीही फॅशन किवा बदल म्हणुन ते अफेअर करतात..
काही मंडळी दिसेल तिथे प्रेमाच्या नावाखाली टपल्या टाकत असतात .. प्रेम नसतच फक्त टाईमपास किवा मी किती भारी .. मी हिला पटवली.. मी त्याला पटवला असाही फुटकळ भाव घेउन वावरत असतात..
काही स्त्री पुरूष पैसे कमावण्यासाठी या गोष्टीकडे वळतात..
काही जण भावनिक गरज म्हणुन जवळ येतात..
प्रेम कोणीही कोणावरही करावं त्याला बंधन असूच नये पण ते शरीरापलिकडे असावं.. एखाद्याने एखादीच्या स्वभावावर प्रेम करावे.. एखादीने त्याच्या कर्तृत्वावर प्रेम करावे.. एखाद्याने कलेवर फीदा व्हावे तर एखाद्या व्यक्तीने दुरुन प्रेम करत तिला जपावे..
प्रेमाच्या नावाखाली फसवणूक असायला नको.. काहीजण इमोशनल ब्लॅक मेलींग करतात किवा शारीरिक अत्याचार करतात हे सगळं महापाप आहे.. यातील काहीही आपल्या हातुन घडु नये याची काळजी प्रत्येकाने घ्यावी..
प्रेम असावे राधा कृष्ण सारखे .. निखळ.., पण आपण माणसे आहोत आणि तो भगवंत आहे त्यामुळे आपल्या काहीना काही अपेक्षा या असणारच आहेत.. पण त्या अवास्तव नसाव्यात.. रुसणं , रागावणं हेही क्षणीक असावं.
खरच मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा आदर करावा.. आणि समोरच्याने आदर करावा असं वर्तन आपले असायला हवे..
प्रेम दिले तरच प्रेम मिळेल त्यामुळे जे हवय तेच द्या..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi