कंधार : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत कंधार तालुक्यातील फुलवळ येथिल श्री बसवेश्वर विद्यालय तालुक्यात खाजगी शाळांमधून प्रथम क्रमांक आल्यामुळे सामाजीक कार्यकर्ते संस्थेचे अध्यक्ष व शासकीय गुत्तेदार वैजनाथ सादलापुरे व फुलवळ नगरीचे शासकीय गुत्तेदार माधवराव पटणे व फुलवळ नगरीचे माजी कारकून नारायण पटणे व शंकराराव कुलकर्णी यांनी आज मंगळवार दि 5 मार्च रोजी दुपारी एक वाजता दरम्यान मुख्याध्यापक मंगनाळे बी. एन.यांचा सत्कार केला व शासकीय गुत्तेदार वैजनाथ सादलापुरे यांनी शाळेसाठी अकरा हजार रुपये चा धनादेश दिला.
कंधार तालुक्यातील फुलवळ येथिल श्री बसवेश्वर विद्यालय तालुक्यात खाजगी शाळांमधून अव्वल आहे. विविध उपक्रम राबवून विदार्थांना स्वावलंबी बनण्याचे शिक्षण या ठिकाणी देण्यात येत असल्याची माहिती सामाजीक कार्यकर्ते संस्थेचे अध्यक्ष व शासकीय गुत्तेदार वैजनाथ सादलापुरे यांनी दिली.