कंधार : प्रतिनिधी
दि. 05-03-2024 रोजी सकाळी ११:०० वाजता श्री शिवाजी विधी महाविद्यालय कंधार व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने मौ. कंधारेवाडी ता. कंधार येथे, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत उपसरपंच शंकरराव डिगोळे यांच्या अध्यक्षतेखाली, ‘युवकांचा ध्यास, ग्राम-शहर विकास, विशेष शिबिरात श्री शिवाजी कॉलेज कंधार येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. माधवराव कदम यांनी मार्गदर्शन करतांना वरील उद्गार काढले.
आज प्रत्येक युवक रोजगाराच्या शोधात आहे. शिक्षण शिकणे म्हणजे नोकरी हे गणित समजतो आहे. नोकरी म्हणजेच त्याला जगण्याचे साधन वाटते आहे. हाताला काम नाही म्हणून मोबाइल च्या सोबत आपले जीवन उध्वस्त करत आहे. पण तरुण वय हे मानवी आयुष्यातील वसंत ऋतु आहे. त्याने ठरवले तर अनेक पर्याय उपलब्ध तो करु शकतो. नोकरी शिवायही व्यवसायिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक अशा अनेक क्षेत्रात तो जाऊ शकतो, जसा तो विचार करेल तसा तो बनू शकतो. परिस्थिति कोणतिही असो, संकटे कितिही येवो त्या प्रत्येक अडचणीवर मात करुन जगने हाच खरा पुरुषार्थ आहे. त्यासाठी उठा ! जागे व्हा ! धीट बना, शक्तिमान बना आणि ध्येय प्राप्त होइपर्यंत थांबू नका. सगळी जबाबदारी स्वतःच्याच खांद्यावर घ्या, तुमच्या भाग्याचे तुम्हीच शिल्पकार आहात. “स्वतःच स्वतःचे भवितव्य घडवा. ‘गतं न शोच्यम,’ या सुभाषिता प्रमाणे जे झाले ते होऊन गेले, त्याबद्दल खंत करीत बसू नका. जे तुम्हास हवे आहे ते तुमच्या स्वतःतच आहे.
आपण त्याचे कारण आहोत. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर ते पूर्ण जिद्द, चिकाटीने,सातत्य ठेऊन – मन, प्राण ओतून मेहनत करा. व्यसना पासून दूर राहा..!, कोणत्याही वाईट विचारला व कल्पनेला थारा देऊ नका…! तमोगुणाचा त्याग करा…! यशस्वी होण्याचा हाच मार्ग आहे. असा उपदेश उपस्थितांना दिला.
या कार्यक्रमासाठी गावकरी, प्रतिष्टित नागरिक भगवानराव कंधारे, आंबादास मोकमपल्ले, स्वंयसेवक, महाविद्यालयातील कर्मचारी बंधुभगिनी सुनिल आंबटवाड, विक्की यन्नावार ,ब्रम्हाजी तेलंग, शेख अलीम, बालाप्रसाद धोंडगे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ. पी.एल. डोम्पले यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधाकरराव कौंसले यांनी केले. कार्यक्रमाची सुरवात वंदे -मातरम् गीताने होऊन राष्ट्रगीताने सांगता झाली.