मुखेड:
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नागेंद्र मंदिर मुखेड बाल संस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे जागतिक विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन व मूल्य संस्कार शिबिर संपन्न झाले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. डॉ. सौ. अरुणा इ टकापल्ले, प्रा. डॉ. भालचंद्र गाजरे, प्रा. गजानन गाडले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सौ. अरुणा इटकापल्ले व प्रा. डॉ. भालचंद्र गाजरे यांनी विज्ञान व अध्यात्म याची इत्यंभूत माहिती दिली. यात स्थानिक सर्व शाळांच्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
या कार्यक्रमासाठी सर्व बालसंस्कार प्रतिनिधी द्वारे शहरातील शाळा महाविद्यालय या ठिकाणी समक्ष भेट घेऊन अध्यात्मिक व विज्ञानाबद्दल माहिती सांगण्यात आली व मूल्य संस्काराचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांचा सहभाग करण्यासाठी विनंती पत्र देण्यात आले होते. या शिबिरामध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग उत्साह दिसून आला व योग्य संस्काराची व अध्यात्माची आवड निर्माण व्हावी या यासाठी मुखेड केंद्राद्वारे केलेला प्रयत्न यशस्वीरित्या पार पाडण्याचे कार्य स्वामी महाराज व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपाशीर्वादाने संपन्न झाले.
विज्ञान प्रदर्शनात प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ आलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. चंद्रकांत एकलारे यांनी केले तर व्यंकटेश कवटीकवार, केंद्र प्रतिनिधी शंकर पांचाळ यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास केंद्रातील सेवेकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.