गुजरातचे सुप्रसिद्ध संत जलाराम बाप्पा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिलीपसिंग कॉलनी हनुमान पेठ नांदेड येथील येथील श्री जलाराम बाप्पा मंदिरात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली असून यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
संत जलाराम बाप्पा यांना मानणारे भक्त संपूर्ण हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. रामभक्त असणाऱ्या बाप्पा यांनी आपल्या आयुष्यात अनेक चमत्कार घडवून आणले आहेत.वीरपुर हे जलाराम बापू यांचे जन्मस्थान असून कोणत्याही प्रकारची दक्षिणा स्वीकारल्या जात नसल्यामुळे त्या ठिकाणी असलेले मंदिर हिंदू धर्मात प्रसिद्ध आहे. माघ कृष्णदशमीला जलाराम बापू यांचे देहावसान झाले.पूज्य जलाराम बाप्पा यांच्यावर गुजराती समाजातील लोहाणा समाज, भानुशाली समाज, कच्छ गुर्जर क्षत्रिय समाज कच्छ कडवा पाटीदार समाज सहित अनेक घटक समाजातील लोकांची श्रद्धा आहे, जलाराम बापाची जयंती असो पुण्यतिथी असो किंवा इतर कोणत्याही जलाराम बाप्पा च्या मंदिरात उत्सव असल्यास समस्त समाज या सर्व कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतात तरोडेकर मार्केट च्या पाठीमागे जलाराम मंदिर पासून बाबुभाई ठक्कर मार्गा पर्यंत पू. जलाराम बाप्पा मंदिर रोड असे नाव देण्यात आलेले आहे हे गुजराती समाजासाठी गौरवाची बाब आहे.विशेष म्हणजे या मंदिराची स्थापना कै.अमृतलालभाई नानाजी ठक्कर यांनी केली व मंदिरा साठी जागा ही त्यांनीच दिली. जलाराम बाप्पांच्या पुण्यतिथीनिमित्त नांदेडच्या मंदिरात मोठा उत्सव घेण्यात आला. सुप्रसिद्ध समाजसेवक दिलीप ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी माजी नगरसेविका जयश्री ठाकूर यांच्या हस्ते उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. दुपारी बारा वाजता देवदेवता मंगल आरती करण्यात आली.श्री जलाराम मंदिर ट्रस्ट नांदेड चे अध्यक्ष किशोरभाई सूरतवाला, सचिव भावनाबेन ठक्कर, सहसचिव हरेशभाई ठक्कर, नांदेड भूषण नवीनभाई ठक्कर,कारोबारी समिति सदस्य
मेहुलभाई दावडा व रामजीभाई गोरी, गुजराती समाजा चे उपाध्यक्ष भवानजीभाई पटेल, कोषाध्यक्ष सुरेशभाई सांगानी, गुजराती समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा हंसाबेन ठक्कर,
यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात छप्पन भोग चा प्रसाद आणला होता. जयश्री व दिलीप ठाकूर यांचा देवस्थान तर्फे शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहुलभाई दावडा यांनी तर आभार ज्येष्ठ भाजप सदस्य
हरेशभाई ठक्कर यांनी मानले. कार्यक्रमाला गुजराती समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(छाया:हरेशभाई ठक्कर)