पन्नाशीनंतर स्त्रीचे शारीरिक , मानसिक , लैंगिक विश्लेषण : महिला दिन भाग ५

 

हा विषय माझी वाचक सखी sunita kande यांनी दिला .. मलाही हा विषय खुप आवडला आहे आणि त्यावर लिहायचा हा प्रयत्न.. सखी मनापासून कृतज्ञ आहे..
५० वय हा फक्त आकडा असायला हवा इतके मनाने आणि विचाराने आपण तरुण असायला हवे.. बालपण आहे तर म्हातारपण येणारच पण ५० च्या तारुण्यात कुठल्याही सखीने स्वतःला कुठल्याच अंगाने कमी लेखु नये .. या वयात आपली सखी ( मासिकपाळी ) आपल्याला सोडुन जायच्या मार्गावर असते म्हणजेच काय प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचे आहे.. त्यावेळी शरीरात अनेक बदल होतात.. मुड स्वींग होणे , हॉट फ्लॅशेश , वजन वाढणे , सखी दरमहिन्याला न येता तिच्या मर्जीने ती यायला लागते आणि शरीरात बदल दिसले की स्त्रीला वाटते आता मला कोणी सुंदर म्हणणार नाही किवा पुरूष फ्लर्टीग करणार नाहीत .. ४० च्या दरम्यान जेव्हा पुरूष फ्लर्ट करतो तेव्हा ते तिला नकोसे असते हा खुप मोठा विरोधाभास आहे आणि शोकांतिका पण आहे..
यावयात आता मीही आहे त्यामुळे मी काय करते ते सांगते.. सगळ्यात आधी न चुकता रोज व्यायाम करते.. स्वतःला वेगवेगळ्या कामात बिझी ठेवते त्यामुळे फ्रेश रहाते..
होटेलींग पार्टी न करता घरी स्वतः स्वयंपाक करुन जेवते..
भरपुर हिंडते , वाचन , लिखाण , मित्रांना भेटणे आणि प्रचंड प्रमाणात सकारात्मकता त्यामुळे मेनोपॉज किवा वय या गोष्टीकडे लक्षच जात नाही.. भगवद्गीता शिकते.. शास्त्र समजुन घेते आणि मला कधीही राग येत नसल्याने आतुन मी शांत रहाते.. जे मी करते ते जर प्रत्येकीने केलं तर प्रत्येकजण मानसिकदृष्ट्या निरोगी राहिल असं मला वाटतं..
या काळात मोठा होणारा बदल म्हणजे योनीला येणारा कोरडेपणा आणि त्यामुळे शारीरिक संबंध थोडे त्रासदायक होतात.. पण हा बदल २/४ वर्षांसाठी असतो.. एकदा सखी आपल्याला सोडुन गेली की लैगिकतेच्या भावना पुन्हा पुर्ववत होतात.. पण हा बदल स्विकारायला थोडं जड जातं . अशावेळी पुरुषांनी स्त्रीला समजुन घेउन तिला थोडं जास्त पॅंपर केलं तर स्त्री यातुन पटकन बाहेर येते.. वजनावर कंट्रोल ठेवणे आपल्याच हातात आहे आणि बिझी रहाणे हेही आपल्याच हातात आहे.. पुरुषांना यावेळी मोलाचा सल्ला Men .. O .. Pause .. ( थोडा पॉज घ्या )
७० वर्षांची सुंदरी आजही उत्तम पध्दतीने सेक्स करते हे मी वाचलय.. यात अतिशयोक्ती नसावी .. हे सहज शक्य आहे फक्त इच्छा आणि आवड हवी.. मन तरुण आणि सुदृढ असेल तर तन आपोआप सुंदर रहातं.. त्यामुळे पन्नाशीनंतर आपण कुठे कमी आहोत ही भावना नको आणि प्रत्येकीला सुंदर दिसण्याचा अधिकार आहे.. जसं हवं तसं भरभरुन जगा .. जशी मी जगते.. या वयात संपूर्ण शरीराला कोरडेपणा येउ शकतो त्यामुळे आहारात बदल करा.. समवयस्क लोकान्मधेच न रहाता ३०/४० वयोगटात रहाण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्यालाही त्या वयाचा फील येतो.. या वयात आपण सगळ्या व्यापातुन मुक्त होतो त्यामुळे सगळ्यात सुंदर रहाण्याचे आणि दिसण्याचे वय हेच आहे.. एखादा पुरुष आपल्याकडे पहात नसला तर आपण त्याच्याकडे पहावं सखी.. हाय काय नाय काय.. शेवटी कायम आनंदी रहाणं महत्वाचं..
सोच बदलो.. देश बदलेगा..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *