कंधार : प्रतिनिधी
दि 04-08-2024 रोजी मौ. कंधारेवाडी ता.कंधार येथे श्री शिवाजी विधी महाविधालय कंधार व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत माजी सरपंच आयनाथराव पाटील कंधारे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष शिबीरात बोलतांना उद्घाटक योगगुरू निळकंठ मोरे यांनी वरील उद्गार काढले.
पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो कलेक्टर असो. काही ही पद असो आपले शरीर निरोगी असेलतर कोणतेही पदभार सांभाळू शकतो. शरीर निरोगी, चांगले असेल तर कोणतेही कार्य करू शकतो. शरीरात रोग व्यार्थी, असतील तर आपण काहीही करू शकत नाही त्यासाठी, तरुणांनी योग साधना, प्राणायाम, व्यायाम करुन व्यसनांपासून दूर राहिले तरच तुमचे ध्येय गाढू शकता. चांगले कार्य करू शकता, माचतिती पर सांभाळू शकता, निरोगी शरीरात निरोगी मन असते, निरोगी मनात कर्तृत्वाची झलक असते, आपले कर्तृत्व चांगले झाले की, आपला विकास, समाजाचा विकास, गावाचा विकास, पर्यायाने देशाच्या विकासास हातभार लागतो. म्हणून या स्पर्धेच्या युगात, धकाधकीच्या जीवनात निरोगी शरीराची गरज असते त्या साठी योग साधना आवश्यक आहे. असे आपल्या भाषणात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कर्मचारी बंधू भगिनी, ब्रम्हाजी तेलंग, बालाप्रसाद धोंडगे, विक्की यन्नावार, सचिन फुलवरे, स्वयं सेवक, अंजली जोंधळे, राजनंदिनी कदम, अजित केंद्रे व ईतर हजर होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. एल. डोम्पले यांनी केले तर आभार सहकार्यक्रमाधिकारी सुनील आंबटवाड यांनी मानले. या कार्यक्रमाची सुरवात वंदे मातरम् गिताने होऊन राष्ट्रगीताने सांगता झाली.