सारखं काय रे गुलु गुलु.. लव यु.. लव्ह यु.. सारखी काय ती रोमॅन्टिक डेट.. जरा काहीतरी बदल हवाच ना…
मी तर कायमच नाविन्याच्या शोधात असते.. अगदी साधी कॉफी असेल तरीही मी कॉफी शॉप बदलते.. कारण कॉफी तीच.. दुध तेच आणि साखरही तशीच गोड.. फार फार काय तर ब्राउन शुगर.. सुरुवातीला ब्राउन शुगर हा शब्द ऐकून घाम यायचा पण जेव्हा कळलं की पांढऱ्या साखरेला ब्राउन रंग फासून आपली डाएट नावाची दिशाभूल केली जाते आणि आपण ती साखर सहज पचवतो.. नंतर ( शुगर फ्री ) गोड नसलेली साखर येते हाही मोठा विनोदच आहे पण तोही आपण लिलया पेलतो आणि मला शुगर आहे म्हणत कौतुकाने मिरवतोही..
डेट म्हटली की गोड प्रियकर आणि प्रेयसी आठवतात होना.. प्रेमात अखंड बुडालेले…नाकातोंडात पाणी जाणार नाही याची काळजी घेउन ते बुडतात हे आपलं नशीब.. त्यांचं ते डोळ्यात डोळे घालून पहाणं असेल चाळीशीतील वात्रट चाळे असतील .. ती मजनूगिरी असेल सगळच बाई एकदम टिपीकल.. तु दोन दिवस बाहेर जाणार मग माझं काय होइल असं म्हणत त्याचा चेहरा पाडणं असेल या सगळ्या गोष्टी माझ्यासारखी लेखिका टिपते आणि जगतेही.. नुसती नौटंकी आणि त्यात कणभर प्रेम असतं पण ते दाखवलं जातं मणभर .. मग मीही अधेमधे जरा खट्याळपणा करते आणि म्हणते , सगळेजण हेच करतात मग मी तेच का करावं ??,, माझा कायमच चौकटीच्या बाहेर जाऊन जगण्याचा प्रयत्न असतो आणि त्यात मी वेगळा विलक्षण आनंदही घेते..
आपल्या मित्रांच्या लिस्टमधे एखादाच नाही तर अनेक ठोंबे असतात .. तसे माझ्याही लिस्ट मधे अनेक आहेत..त्यातला एखादा ठोंब्या हेरायचा आणि त्याच्यासोबत मनातल्या मनात रोमॅन्टिक डेट करायची कारण प्रत्यक्षात ती रोमॅन्टिक होवूच शकत नाही..काल अशाच एका ठोंब्याचा मेसेज आला.. वेळ दुपारी दीढची.. पुण्यात मार्चमधे दुपारी दीढ वाजता ही रोमॅन्टिक लेखिका डेटवर जाते .. अहो कोणासोबत काय विचारता.. माझाच ठोंब्या मित्र..By profession he is Doctor हा.. सगळेच डॉक्टर हे ठोंबे नसतील आणि सगळे डॉक्टर रोमॅन्टिकही नसतील.. काल माझा मुड काहीसा वेगळाच होता.. ठोंब्या म्हणजे वाईट नाही बरं का फक्त तो माझ्यासारखा रोमॅन्टिक नाही इतकच काय ते..काल माझी ज्युस डेट होती कारण दुपारचं कडक उन्ह होतं.. होटेल भारी.. ॲंबीयंस भारी.. कॉरसेट घालून( pink white ) मी ऐटीत त्या होटेल मधे बसले होते..मला पाहून तो म्हणाला , सोनल तुला कुठल्याही प्रकारचे कपडे सुट होतात कारण तुझी Anatomy चांगली आहे.. अरे यार फिगर म्हण की .. ज्याच्यासाठी मी रोज दीढ तास व्यायाम करते. टेकडीवरजाते. ऱनींग करते आणि याला हा Anatomy म्हणतो. कठीण कठीण कठीण किती पुरूष हृदय बाई..
होटेल मधे मंद म्युझिक होतं कारण होटेल चं नाव होतं F.M.L.(food , music , love ) नावाप्रमाणेच तिथे फुड होतं , म्युझिक होतं फक्त कमी होती ती लव्ह ची म्हणजेच इंग्रजीतलं प्रेम हो.. ते करायला माझ्यासारखी रसिक होती ना पण विरूध्द दिशेला नेमका ठोंब्या बसला होता.. माझी फिगर पाहून ज्याला Anatomy हा शब्द सुचू शकतो त्याला ठोंब्या नाहीतर काय म्हणावं तुम्हीच सांगा..मादक , सेक्सी हे शब्द यांच्या जाडजुड मेडीकल बुकात नसावेतच..
हिरव्या रंगाचा कापडी मास्क लावून जेव्हा तो मला भेटायला येतो तेव्हा वाटतं , मी ॲंबुलंस मधे आहे की कारमधे की हॉस्पिटल च्या बेडवर ??.. डोचकं निसतं बधीर हुतय.. नशीब गळ्यात स्टेथोस्कोप नसतो ..फोटो काढ हे मोबाईल हातात देउन त्याला सांगावं लागतं .. आणि तरीही फोटो फक्त दोनच काढले जातात आणि तेही एकाच पोझ मधे..प्रश्न उरतो माझ्या सौंदर्याचं काय ?? आणि होटेल च्या ॲंबीयंसचं काय ??.. देवा… हा विचार त्या ठोंब्याच्या मनात कसा येइल ना ..
इतकं सगळं झाल्यावर तो मला म्हणतो , सोनल तु मला का आवडतेस माहीत आहे ??.. का ??असं विचारण्याच्या आत तो म्हणतो , कारण तु तुला हवं तसं जगतेस .. जीवनाचा पुरेपूर आनंद घेतेस आणि मी मनात म्हणते , तु मला का आवडत नाहीस माहीत आहे का तुला ??.. आणि त्याचं मी उत्तरही मनातच देते कारण माझ्यासारख्या रसिकव्यक्तीला तुला काहीही देता येत नाही.. तरीही असे ठोंबे आपल्या आयुष्यात हवेतच.. तुमच्याही असतील की.. नाहीतर निसर्ग चक्र चालणार कसं ना.. Hot , sexy figure ला Anatomy सारखा रूक्ष शब्द वापरून ही व्यक्ती माझी तारीफ करते.. मान गये भिडु.. अशी माझी कालची ठोंब्यासोबतची डेट झाली.. मी मज्जा घेतली आता वाचून तुम्ही आनंद घ्या… आणिअशी अनोखी डेटही अनुभवा तीही ३५ डीग्रीमधे. डेटचं सोनं कसं करावं तर असा मस्त लेख लिहूनच.. जिओ..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi