भारत जोडो, संविधान बचाओ अभियानाची बैठक संपन्न ..!!

अहमदपूर ..!!दिनांक 16 मार्च 2024 रोजी अहमदपूर येथील शासकीय विश्रामगृहावर सकाळी 11 ते 2 या वेळेत भारत जोडो अभियान व संविधान बचाओची बैठक पार पडली बैठकीस महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना( उ.बा.ठा), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या पक्षांच्या प्रतिनिधी सोबतच जनआंदोलनाचे प्रतिनिधीही उपस्थित होते .
बैठकीत लातूर लोकसभा मतदारसंघातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा जनआंदोलनाच्या वतीने घेण्यात आला. त्यासोबतच जनआंदोलन व महाविकास आघाडी, इंडियाआघाडी यांचे नाते स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार विनायकरावजी पाटील, तालुकाध्यक्ष राम बेल्लाळे , भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. गणेश कदम , माजी जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत मद्दे, शिवसेना
उ. बा. ठा. चे तालुकाध्यक्ष विलास पवार,
उपतालुकाप्रमुख गणेश माने व किसान सभेचे तालुकाध्यक्ष सुभाष साबळे , किसान सभेचे कार्यकर्ते सुनील खंडाळीकर यांच्यासह जनआंदोलनाचे तालुका समन्वयक प्रभाकर तिडके, सामाजिक कार्यकर्ते अण्णाराव सूर्यवंशी इ. सह अनेक कार्यकर्ते हजर होते.
यावेळी बैठकीचे प्रास्ताविक भारत जोडो आंदोलनाच्या अभियानाचे तालुका समन्वयक प्रभाकर तिडके यांनी केले. तर अध्यक्ष पदावरून बोलताना जिल्हा समन्वयक गणपत पाटील यांनी भारत जोडो अभियान व महाविकास आघाडीतील घटक पक्ष यांच्यात सुसंवाद राहण्याची गरज आधोरेखित केली व त्याला महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी योग्य प्रतिसाद दिला .
बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भाने चर्चा झाली. या चर्चेत जिल्हा समन्वयक राजकुमार होळीकर यांनी बोलताना सांगितले की,गेल्या दहा वर्षाचा इतिहास पाहता विद्यमान केंद्र सरकार संविधान मोडीत काढायला निघाले आहे याचा अर्थच असा होतो की, या सरकारची वाटचाल हुकूमशाहीच्या दृष्टीने सुरू आहे यामुळे भारत जोडो अभियानाच्या वतीने देशभरात इंडिया आघाडीच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्रातही भारत जोडो महाविकास आघाडीच्या सोबत आहे त्याचाच भाग समजून ही बैठक आहे असे मी समजतो.
या चर्चेत माजी आमदार विनायकराव पाटील साहेब, राम बेल्लाळे, डॉ. गणेश कदम, चंद्रकांत मद्दे, हेमंत माकणे, किसान सभेचे सुनील खंडाळीकर ,गणेश माने यांनी चर्चेत सहभाग घेतला.बैठकीचे आभार तालुका समन्वयक प्रभाकर तिडके यांनी मांडले..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *