खासदार चिखलीकर साहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व…

 

खासदार चिखलीकर साहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे.. ते दिल्लीत गेले पण तेथे कधीच स्थिरावले नाही. त्यांनी गल्लीशी असलेली आपली नाळ कधीच तुटू दिली नाही.
ज्यांच्या जीवनाचे सार हे संघर्ष आहे असा ध्येयवेढा कर्तबगार लोकनेता म्हणजे खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर. तळागाळातील लोकांसाठी एक भरीव कार्य करणारे साहेब म्हणजे आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी झटणारा नेता म्हणजे प्रतापरावजी पाटील चिखलीकर.

कार्यकर्त्यांचा जीव की प्राण असणारा नेता म्हणून आणि एका हाके वर हजारो कार्यकर्ते गोळा करणारा नेता म्हणून ज्यांचे मोठी ओळख आहे असे साहेब म्हणजे प्रतापरावजी पाटील चिखलीकर. आणि यामुळेच राजकारणातील एका उंचीवर साहेब पोहोचले आहेत. लोकसभेसारख्या सर्वोच्च सभागृहात साहेब आपल्या जिल्ह्याचे नेतृत्व करतात ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कारण साहेबांची नाळ ही या मातीशी जोडलेली आहे. इथल्या प्रत्येक प्रश्नांची जाण साहेबांना आहे त्यामुळेच जनसामान्यांचा प्रश्न संसदेत मांडण्यासाठी आपण त्यांच्याकडे हे नेतृत्व सोपवलेलं आहे.

मैत्री जपण्याची एक विलक्षण हातोटी आदरणीय खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये आहे.मैत्रीला नि:स्वार्थपणे जागणारा एक उत्तम मित्र. असा त्यांचा त्यांच्या मित्रपरिवारात लौकिक आहे. कार्यकर्त्याने अगर एखाद्या नेत्याने कानात सांगितलेले त्यांना अजिबात आवडत नाही. जे आहे ते स्पष्टपणे समोर बोला हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अनोखा पैलू आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर खोटे बोलता येत नाही. एखाद्या कार्यकर्त्याने दुसऱ्याविषयी चुगली अथवा चाडी केलेली त्यांना अजिबात खपत नाही अशा कार्यकर्त्याला ते दूरच ठेवतात.

 

त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी विलक्षण धाक आणि आदरयुक्त मान आहे.स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वाधिक महत्त्वाचा पैलू. एखाद्या पक्षाच्या प्रमुखापासून ते समपातळीवरील नेत्यांपर्यंत आणि छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांसमोर ही ते अत्यंत स्पष्टपणे व परखडपणे आपली भूमिका मांडतात. त्यांनी मांडलेली मते, घेतलेली भूमिका अथवा निर्णय अचूक असतात. कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी त्या निवडणुकीचे सर्वोत्तम व्यवस्थापन हा आजच्या राजकारणाचा विजयी मंत्र आहे.

 

 

*सुनिल रामदासी*
पत्रकार
9423136441

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *