चिमणी दिना निमित्य 20 मार्च रोजी पक्षीमित्र उत्तम पेठकर यांचा वृक्षमित्र शिवसांब घोडके यांच्या हस्ते बहादरपुरा येथे सन्मान.

 

कंधार : प्रतिनिधी

 

जागतिक चिमणी दिवस 20 मार्च गेली अनेक वर्षापासून क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथे सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारच्या वतीने साजरा केला जातो.पक्षीमित्र उत्तमराव पाटील पेठकर हे अनेक वर्षापासून पक्षाची सेवा करतात. त्याचे हे कार्य पंचक्रोशीत परिचीत आहे. त्या कार्याची दखल घेली आज 20 मार्च रोजी बुधवार दुपारी बारा वाजता जातो.पक्षीमित्र उत्तमराव पाटील पेठकर यांचा सत्कार पानभोसी तालुका कंधार येथित सिध्देश्वर मंदिराच्या माळरानवावर नंदनवन फुलविणारे वृक्षमित्र, वनरक्षक शिवसांब घोडके पानभोसीकर, व साहित्यीक सु द घाटे यांच्या हस्ते करण्यात आला. सदरील कार्यक्रमाचे नियोजन बहाद्दरपुरा येथिल भुमिपूत्र दत्ताञय एमेकर यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी डी.जी वाघमारे, माणिक बोरकर यांची उपस्थिती होती.

 

आणीबाणीविरुद्ध लढ्यात तत्कालीन सरकारचा विरोध स्वांतत्र्य सेनानी डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली मन्याड खोर्‍यात क्रांति नगरी बहाद्दरपूरा,ता.कंधार येथे झाला.आणीबाणीत नाशीक सेंट्रल जेलमध्ये कारावास भोगत असतांना कारागृहात स्वच्छतेचे काम सुरु असतांना बिचाऱ्या चिमणींची घरटी तोडण्यात आली.हे बहाद्दरपुरचे भुमीपूत्र डाॅ.भाई मुक्ताईसुताने आपल्या सहकार्यासह कारागृहातच चिमणीची घरटी बचाव सत्याग्रह करून ती घरटी जसेच्या तसे करण्यास भाग पाडले असा क्रांतीकारी क्रांतिभुवन बहाद्दरपुऱ्या चा इतिहास आहे.

क्रांतिभुवन बहाद्दरपुऱ्यात छ.शिवजी महाराज यांच्या रुबाबदार पुर्णाकृती पुतळ्याच्या डाव्या बाजुला पक्षीमित्र उत्तमराव पाटील पेठकर यांचे हाॅटेल आहे या हाॅटेलच्या समोर चिमणी पक्ष्यांसाठी दररोज २०/ २५ किलो तांदूळ सोबत पाण्याची व्यवस्था,गाईला वैरण,मानवास १०० थंड पाण्याच्या जार,श्वानांना भाकरी मन्याड नदीतील माश्यांना दररोज ३ किलो पेंड (खली) असे दान वडील तुळशीराम पाटील पेठकर यांच्या काळा पासून आजतागायत गेली ६० वर्षापासून नित्याने करतात यंदाचे एकसष्टीचे वर्ष आहे.माझ्या नगरीतील भुत दया मित्र उत्तमराव पाटील पेठकर यांचे कार्य चिमुकल्या चिमणी पक्ष्यांचे जनत करण्यास लाख मोलाचे आहे.गेली ५०\६० वर्षापासून चिमणीस दाना-पाणी ठेवून त्या पक्ष्याचे अस्तित्व टिकविण्यास आपला खारीचा वाटा उचलत आहेत.यंदाच्या १४ व्या जागतिक चिमणी दिनी पक्षीमित्र उत्तमराव पाटील पेठकर या अवलियाचा सन्मान पानभोसी नगरीत दररोज एक वृक्षराजाचे रोपण सिध्देश्वर मंदिराच्या माळरानवावर नंदनवन फुलविणारे वृक्षमित्र अन् वनरक्षक शिवसांब घोडके पानभोसीकर या बहाद्दर वृक्षप्रेमिंनी हे सतीचे वाणं हाती घेतले आहे.यांच्या समर्थ हस्ते पक्षीमित्र उत्तमराव पाटील पेठकर यांचा सत्कार शाल, पुष्पहार, बोरीची काटेरी रोपे आणि क्रांतिचे प्रणेते डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या वरील संकलित लेख संग्रह प्रकाशक श्री शिवाजी हायस्कूल खोकडपूरा संभाजीनगर यांचा ग्रंथ देऊन वृक्षमित्र घोडके साहेब यांनी ह्रदय सन्मान केला.या प्रसंगी त्यांनी सत्कार झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाले की, आपल्याकडे मानवाच्या मृत्यूनंतर कावघास ठेवण्याची भारतीय परंपरा आहे.

ती कावघासाची संकल्पना मी माझ्या हयातीत पूर्ण करतो आहे.मृत्यूनंतर तो कावघास ठेवलेला मी पाहू शकत नाही.म्हणून मला छंदच लागला आहे.देवावरचे फुल चुकेल पण माझ्या भुत दयेत माझा राम समजून नित्याने माझे अखंडित काम नेटाने सुरु ठेवले आहे.असा आगळा-वेगळा कार्यक्रम पक्षीमित्र उत्तमराव पा. पेठकर यांच्या निवासस्थानी पार पडला.

या कार्यक्रमा प्रसंगी रुमणंपेच ग्रामीण कथासंग्रहाचे लेखक कथाकार सेवानिवृत्त प्राध्यापक सुरेशजी दत्तात्रय घाटे सर,युगसाक्षी लाईवचे लेखनी बहाद्दर पत्रकार मित्र आणि डिजिटल मुख्याध्यापक दिगंबर वाघमारे , माणिकराव बोरकर आणि सुलेखनकार गोपाळसुत दत्तात्रय एमेकर व उत्तमरावाचे बंधु माधवराव पाटील पेठकर यांची अधिश्वरी सौ पेठकर ताई आदीजण उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *