लातूर लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी लोहा कंधार मतदार संघातील शाळा कॉलेजातून विविध कार्यक्रम घेऊन जनजागृती करावी – उप विभागीय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांचे आवाहन

 

(कंधार : दिगांबर वाघमारे )

लातूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच दि.७ मे २०२४ रोजी होणार असून, लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभे अंतर्गत आहे. लातूर लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी लोहा कंधार मतदार संघातील शाळा कॉलेजातून विदार्थी व तरुणांसाठी चित्रकला, भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पथनाटय, मोटारसायकल रॅली, प्रभातफेरी, सेल्फी पाईंट,आदीसह अनेक उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणात मतदान करण्या बाबत जनजागृती करावी अशा सुचना उप विभागीय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांनी आज बुधवार दि. 20 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजता लोहा कंधार मतदार संघातील SVEEP कार्यक्रम बाबत लोहा तहसिल कार्यालय येथे बैठक घेण्यात आली त्यात सर्व कॉलेज चे प्राचार्य, जिल्हा परिषद मुख्याध्यापक व खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा मुख्याध्यापकांना देण्यात आली व सर्व विद्यार्थी व तरुणांना पालकांना सहभाग करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.

एकही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचीत राहणार नाही यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे.त्यासाठी या मतदार संघातील प्रत्येक मतदारा पर्यंत शाळा कॉलेजाच्या माध्यमातून पोहचण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उप विभागीय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार कंधारचे तहसीलदार रामेश्वर गोरे,लोहा येथिल तहसीलदार विठ्ठल परळीकर,लोहा गटशिक्षणाधिकारी सतिश व्यवहारे, कंधारचे गटशिक्षणाधिकारी वसंत मेटकर आदीसह सर्व कॉलेज चे प्राचार्य, जिल्हा परिषद मुख्याध्यापक व खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा चे मुख्याध्यापक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *