नांदेड/प्रतिनिधी-कॉंग्रेस कमिटी क्षत्रीय राजपूत सेलच्या तालुकाध्यक्षपदी पंकजनगर धनेगाव येथील विजेंद्रसिंह हनुमानसिंह ठाकूर यांची कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण यांनी शुक्रवार दि.22 रोजी नियुक्ती केली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेसला चांगलीच गळती लागली आहे. अनेक कॉंग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतांना दिसून येत आहे. निष्ठावंत असलेल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत आहे.
शुक्रवारी कॉंग्रेस पक्षात निष्ठेने काम करणारे विजेंद्रसिंह ठाकूर यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार कॉंग्रेस कमिटी क्षत्रीय राजपूत सेलचे अध्यक्ष पंकजसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी चव्हाण यांनी नियुक्ती केली आहे. त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. यावेळी डॉ.करणा जमदाडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.