एक मोठ राजकीय वलय निर्माण झाले की, माणसाचा कार्यक्षेत्र वाढतं कामाचा व्याप वाढतो,अनेक प्रकारचे लोक आपल्याला जोडले जातात. अशा परिस्थितीत सर्वात महत्त्वाचा आपल्या अंगी हवा असणारा गुण म्हणजे संयम आणि हाच गुण आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांमध्ये पहावयास मिळतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, मी त्या ईश्वराचा भक्त आहे, ज्याला लोक सामान्य माणूस म्हणतात. सामान्यमाणसांची निःस्सीम मनोभावे सेवा करणारी, त्यांना प्रेम देणारी माणसे विरळच असतात. पण त्याला खासदार चिखलीकर साहेब हे अपवाद आहेत. नेहमी जनसामान्यांमध्ये रमणारा माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे. ते सामान्य माणूस आणि कार्यकर्त्यांना केंद्रबिंदू मानून आपली वाटचाल करत असतात.
जनसामान्यात दांडगा संपर्क असल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यांच्याकडून आपले काम निश्चितच होणार यामुळे दुःखी, कष्टी व गरजू माणसांसाठी धावून जाणारा एक देव माणूस अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ हे संत तुकारामांच्या गाथेमधील वचन त्यांच्या नित्य जीवनाचे मुख्य सार आहे.
कोणतीही गोष्ट करताना केवळ कल्पना करून चालत नसते तर ती प्रत्यक्ष अमलात आणण्याची गरज असते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात या गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे. आपल्या माणसांच्या भल्यासाठी सतत काहीतरी विधायक आणि रचनात्मक कार्य करावे लागते. या गोष्टीची पुरेपूर जाण साहेबांना आहे. ते एक सेवावृत्ती आहेत, आनंदयात्री आहेत. सतत इतरांना मदत करण्यात त्यांना एक प्रकारचा अपूर्व आनंद मिळतो, समाधान मिळते. त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान मानवतावादी आहे. आणि याच गोष्टीतून त्यांना राजकारणाबरोबरच सामाजिक कार्यातही काम करण्याची ऊर्जा मिळते. वेळ मिळेल तसा संत महात्म्यांच्या सानिध्यात आणि आशीर्वादाने आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करणे, या गोष्टीची साहेबांना नितांत आवड आहे.
नांदेड नगरी ही श्री गुरुगोविंदसिंघजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत जगप्रसिद्ध असा सचखंड गुरुद्वारा आहे. लाखोंच्या संख्येने जगभरातील भाविक येथे भेट देत असतात. गुरुद्वारातील संत बाबांच्या आशीर्वादाने आणि नांदेड नगरीत येणाऱ्या संत महात्म्यांच्या सहवासाने जनसामान्यांची सेवा करताना साहेब पहावयास मिळतात. आपल्या कामाच्या प्रचंड व्यापातूनही ते आपल्या परिसरात होणाऱ्या सामाजिक आणि धार्मिक कार्यात आवर्जून सहभागी होतात. सर्व लोकांमध्ये साहेब सहभागी होत असल्याने त्यांच्याकडे एक प्रचंड मोठा ताकतीचा समुदाय एक वाटला आहे. आणि हीच गोष्ट साहेबांना ऊर्जा देणारी आहे.
*सुनिल रामदासी*
पत्रकार
9423136441