मुखेड: जि. प. हायस्कूल मुलांचे येथील मुख्याध्यापक आनंदराव दौलतराव सुर्यवंशी हे दि.३१ मार्च रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
आनंदराव सुर्यवंशी यांचा मुखेड तालुक्यातील होंडाळा येथे सामान्य कुटुंबात जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परीस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. आपण शिक्षक व्हावे हे त्यांना नेहमी वाटायचे. पदवी उतिर्ण झाल्यानंतर त्यांनी बीएड व्यावसायिक शिक्षण पूर्ण केले व आपल्या इच्छेप्रमाणे १ जुलै १९९१ रोजी शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी प्रामाणिकपणे विद्यार्थांना घडविले व विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवले. दि. ३१ रोजी जि. प. हायस्कूल मुलांचे शाळेच्या वतीने त्यांना निरोप दिला जाणार आहे.