(कंधार : दिगांबर वाघमारे )
दि 30/03/2024 रोजी नामदेव महाराज म़ंगल कार्यालय विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर कंधार येथे पी डी केंद्रे सर यांच्या मुलीच्या विवाह सोहळा होता त्याप्रसंगी 88 लोहा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सौ अरुणा संगेवार,तहसीलदार लोहा विठ्ठल परळीकर,तहसीलदार कंधार श्री रामेश्वर गोरे,गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीचे काम 88 लोहा मतदार संघात चालू असून आज रोजी कंधार येथे विवाह प्रसंगी दिड ते दोन हजार मतदारांना शपथ देण्यात आली.
या प्रसंगी नोडल अधिकारी तथा केंद्र प्रमुख एन एम वाघमारे ,एम एन घुगे,डी एन मंगनाळे,विक्रम चुकलवाड,सौ संतोषी थगनर ,काशिनाथ सिरशीकर,नवनाथ बोळकेकर यांनी शपथ दिली. स्विप कक्षाच्या या उपक्रमाबद्दल विशेष लक्ष वेधल्या गेले.