कै शं गु ग्रामीण महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्यावतीने नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून , (New education policy, NEP. 2020,) Milestone या भिंतीपत्राकाचे विमोचन

धर्मापुरी : येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्यावतीने नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून , (New education policy, NEP. 2020,) Milestone या भिंतीपत्राकाचे विमोचन आज दि 30 मार्च 2024 रोजी करण्यात आले. चालू शैक्षणिक वर्षातील कदाचित ही शेवटची विद्यार्थी केंद्रित अँक्टिव्हिटी असणार आहे. कारण 2 एप्रिल 24 पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर सलग्नित महाविद्यालयात परिक्षा चालू होणार आहेत. येथील भुगोल विभाग प्रमुख प्रा एस जे चाटे यांच्या भाषा शैलीवर आधारित हे भिंतीपत्रक ( Wallpaper ) आहे. या कामी अमर नि पाटील, शिवहार म चापुलकर आणि वैभव भा फड यांनी पुढाकार घेतला. त्यांना इंग्रजी विभाग प्रमुख प्रा डॉ पी डी मामडगे आणि प्रा भगवान आमलापुरे यांनी मार्गदर्शन केले. फोटो क्लिक : प्रा डॉ टी व्ही चाटे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *