-
मार्च महिना संपून एप्रिल महिना सुरू झाला. एप्रिल महिन्यात सर्वात आधी 1 एप्रिल येते त्या दिवशी सगळेजण उत्साहात एकच काम करतात लोकांना ‘वेड्यात काढायचं’. अनेक प्लॅन करून आपल्या नातेवाईकांना,
- मित्र-मैत्रिणींना आणि प्रियजनांना वेड्यात काढण्यासाठी नाही ते प्रयत्न त्या दिवशी केले जाते. वेगवेगळ्या देशांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या परंपरेने साजरा केला जातो. पण सगळ्या परंपरामध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे समोरच्याला ‘वेड्यात काढायची,
- खोड्या, मस्करी, चेष्टा करायची. यालाच ‘एप्रिल फूल’ बनवणे असे म्हणतात. या दिवसाचे अनेक किस्से तुम्ही सांगितले असतील किंवा ऐकले असतील.
एखादी खोड हि सकारात्मक दृष्टिकोनातून केली तर एखाद्याच्या आरोग्यासाठी चांगले असू शकते कारण ते “विनोद, खोडी, पोट धरून हसण्यास भाग पाडते” हसण्याला प्रोत्साहन देते, तणावमुक्ती होऊन हृदयावरील ताण कमी करण्यासाठी फायद्याचे असू शकते. तर दुसरीकडे नकारात्मक दृष्टिकोनाततुन पाहिले तर एप्रिल फूलच्या नावाने फसवणुकीचे वर्णन हे ” भयानक, असभ्य आणि जिव्हारी - लागणारे होऊ शकते. एप्रिल फुलच्या नादात केलेली खोडी केव्हा चेष्टा ही नंतर खरी काय आणि खोटी काय हे कळल्यावर त्याचा फार चुकीचा अर्थ लावला जाऊन धोका निर्माण होऊ शकतो. आत्ताची परिस्थिती पाहता कोणालाही आपल्या स्वता:ची चेष्टा झालेली आवडत नाही किंवा व्हावी असं वाटत नाही. आपली चेष्टा झाली असं कळलं तर ती चेष्टा विनोदात न घेता रागात घेतली जाते. त्यामुळे विचित्र अशा परिस्थितीला आणि गुन्हेगारीला सामोरे जावे लागेल. अश्या
-
एप्रिल फूलच्या खोड्या आणि फसवणुकीचे वर्तन हे दिवसेंदिवस वादग्रस्त होत आहे.
त्यामुळे एप्रिल फुलच्या नावाने केली जाणारी चेष्टा, मस्करी,खोडी,विनोद हे जपून करावे आणि कोणी आपली चेष्टा केल्यास स्वतःमध्ये ती सहनशक्ती निर्माण करावी.
असे मला वाटते सर्वांना एप्रिल फुलाच्या खूप खूप शुभेच्छा !रूचिरा बेटकर नांदेड
9970774211