भीमशक्ती च्या प्रदेश सरचिटणीस पदी डॉ दिनेश निखाते

नांदेड :नांदेड काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष डॉ दिनेश यशवंतराव निखाते यांची संस्थापक खासदार चंद्रकांत हंडोरे याच्या भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.मुंबईत त्यांना पत्र देण्यात आहे

डॉ दिनेश निखाते याने सामाजिक व राजकीय कार्य मोठे आहे.जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण संभापती पदावर त्यांनी अडीच वर्ष प्रभावीपणे काम केले आहे.
डॉ दिनेश निखाते यांची नुकतीच काँग्रेस पक्षाने नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड केली आहे.भीमशक्ती या सामाजिक संघटनेचे संस्थापक खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी डॉ दिनेश निखाते यांच्यावर प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी टाकली आहे .मुंबई प्रदेश अध्यक्ष शशिकांत बनसोडे याची विशेष उपस्थिती होती
काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक सुरेश हटकर संजय कवठेकर मिलिंद लोकरे , प्रकाश दिपके। व मित्रपरिवार उपस्थित होते
राज्यात व जिल्ह्यात भीमशक्ती ची विचारधारा व खासदार चंद्रकांत हंडोरे याचे
विचार या संघटनेच्या माध्यमातून समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास डॉ दिनेश निखातेयांनी नियुक्ती नंतर व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *