फेसबुक चाळताना खूपच मसाला मिळतो पण तो मसाला दुधात घालायचा कि भाजीत हे आपल्याच हातात आहे.. आज मिळालेल्या मसाल्याचे मी मसाला दुध करायचे ठरवले .. तिखट नको जरा गोडच बरं ना..
कुठल्यातरी अभिनेत्रीच्या लग्नाला एक महिना झाला म्हणुन तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी अमुक एक पदार्थ बनवला ते वाचून मनात विचार आला अरे यार असं आमच्या वेळी का नाही झाले.. प्रेम तेच भावना त्याच.. पण या तरुण पिढीचे काहीतरी भलतेच असते..सोशल मिडीयावर त्यांचं प्रेम असं काही उतू जातं की आम्हाला आमचं त्यावेळी प्रेम नव्हतं का असं वाटायला लागतं.. नवऱ्यासोबतचे फोटो काय , रील्स काय , विचारु नका बाई.. लक्ष्मण देशपांडेच्या भाषेत बोलायचे झालं तर छातीत नुसतं लसलसतं.. काही जणी सासूसोबत रेसीपी शेअर करतात तर काही जणी सासू कशी चांगली मैत्रीण आहे हे सांगतात..
तिची सासू पाहून आपल्याला वाटतं , यार मी काय पाप केलं होतं म्हणुन या सारख्या सुचना वाट्याला आल्या.. मी पण या अभिनेत्रीसारखी मुलगीच होते की..दर महिन्याला लग्नाचा वाढदिवस साजरा होतो.. हनीमूनचे बाथटब मधले फोटो शेअर होतात.. ते बाथटब प्रेमप्रकरण पाहिलं की वाटतं , अशोक सराफ टॉवेल विसरुन का बरं आंघोळीला जायचे ??.. त्यांची मोलकरीण पाठीला मस्त साबण लावून द्यायची .. अहा , ! काय तो रोमान्स.. ती दोन फुले एकमेकांना भेटायची आणि आम्ही इकडे रोमांचीत व्हायचो .. पण आता हे टबात बुचकळताना पाहिलं की एकतर काहीच होत नाही किवा आमच्या पिढीला का नाही म्हणुन जेलसी होते..
दर महिन्याला यांचं हनीमून पाहून या वयात आम्हाला पण हनीमूनला जावं वाटतं.. आज काय बिकीनी .. उद्या काय तर शॉर्टस .. सगळा शॉर्टकटच राव.. मधे एक व्हीडीओ पाहिला त्यात असं होतं , ती पोळ्या लाटतेय आणि तो मागून तिला पकडून उभा आहे ते दृश्य पाहिले आणि विचार केला work from home भाऊ.. आपल्या वेळी कुठं होतं ते समदं.. च्यामारी आपलं नशीबच फुटकं.. लटक्या स्वरात मी सचिनला म्हटलं, अरे जरा work from home चा उपयोग कर तर तो मला म्हणाला , आज भांडी मी घासु का ?? .. कप्पाळ माझं हे असं असतय आमच्या पिढीचं.. मै क्या बोल रहा है , तु क्या बोल रहा है.. ..
आम्ही रोजच अशा अभिनेत्रीना फॉलो करते .. चटक लागली म्हणा ना.. त्यांचा तो मेकअप .. त्यांच्या साड्या.. त्यांचे ब्लाउज .. त्यांचं नवऱ्यावर असलेलं प्रेम.हे सगळं फॉलो करत असताना अचानक समोर न्युज येते ती म्हणजे अमुक एक अभिनेत्रीचा घटस्फोट … तीच ती अभिनेत्री जी दर महिन्याला marriage Anniversary साजरी करायची.. तेच दोघे एका ताटात जेवायचे.. तेच दोघे एकमेकांना भरवुन आम्हाला जळवायचे..त्यावेळी त्यांचा हेवा वाटायचा आणि आता ??..
१० महिने सुध्दा यांना प्रेम टिकवता येत नाही याचं वाईट वाटतं.. हेच का ते बाथटब वालं प्रेम .. तेव्हा जाणवतं आपल्याला संसार टिकवायचा होता.. आपल्याला नाती जपायची होती.. आम्ही प्रेमाच्या बाबतीत प्रॅक्टिकल राहूच शकत नाही.. आम्ही असेल त्या परिस्थितीत आपल्या जोडीदारासोबत रहातो.. आता त्यांचा हेवा वाटत नाही तर किव येते.. लव्ह मॅरेज करत असताना कुठे जातं प्रेम.. तेव्हा त्यांना एकमेकांच्या कमतरता दिसत नाहीत का ??.. आणि त्या कमतरतांवर मात करायची यांची ताकद त्या पिझ्झा बर्गर मधे जाते का ??.. नक्की काय असेल ना..
आंघोळीसाठी जाताना टॉवेल विसरावा कि सोबत न्यावा ?
नवऱ्याच्या डोक्याला तेल लावून द्यावं की डोक्यावर मिऱ्या वाटाव्या ??
कमी पैशात सुख शोधावं की दर दोन वर्षाने नवीन पार्ट्नर शोधावा ??
नक्की काय हवय याचा विचार नवीन पिढीने जरुर करावा..
पालक आणि मुलं यातील संवाद वाढायला हवा तरच या प्रश्नांची उत्तरे मिळतील..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi