कंधार पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक आर यू गणाचार्य 31 मार्च रोजी जवळपास 34 वर्षे पोलीस दलात विविध पदावर सेवा बजावून ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनीच आपले मनोगतातून सेवानिवृत्त होताना सर्वांचे आभार मानले आहे… त्यांना युगसाक्षी लाईव्ह परीवाराच्या वतीने पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा… (त्यांचा संदेश पुढील प्रमाणे )…
मी आज दि ३१/०३/२०२४रोजी नांदेड जिल्हा पोलिस दलातून पोलिस उपनिरीक्षक या पदावरून सेवा निवृत्त होत आहे, मी दि ०३/११/१९९०रोजी नांदेड जिल्ह्यात पोलिस अंमलदार म्हणून भरती झालो होतो, मी यापूर्वी पोलिस मुख्यालय नांदेड, पोलिस स्टेशन उमरी,बिलोली, शहर वाहतूक शाखा नांदेड, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, शेवटी पोलिस स्टेशन कंधार येथून पोलिस उपनिरीक्षक या पदावरून सेवा निवृत्त होत आहे ,आपण सर्वांनी मला पोलिस खात्यात सेवा करीत असताना वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केलो यामुळे मी चांगल्या प्रकारे सेवा करू शकलो याबदल मी आपला अत्यंत ऋणी आहे, आपणा सर्वांच्या सहकार्याने, मदतीने व आपल्या कृपाशीर्वादाने मी नांदेड पोलीस दलात चांगल्या प्रकारे सेवा करू शकलो असेच मला आपणा सर्वांकडून माझ्या पुढील भावी आयुष्यासाठी व माझ्या कुटुंबावर सहकार्य, प्रेम, कृपाशीर्वाद असू द्या हिच माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, माझ्या कडून कळत नकळत आपणास त्रास किंवा आपले मण दुखावले गेले असेल तर आपण सर्वांनी मला मोठ्या मणानी माफ व क्षमा करावे हि माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे. 🙏🙏
आपलाच आर यू गणाचार्य, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस स्टेशन कंधार जिल्हा नांदेड